Shree Krishna Janmashtami 2022: श्रावण महिन्यात सणांची पर्वणी असते. प्रत्येक सणाचं एक वेगळेपण आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. या दिवसाची भक्त मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतात. या वर्षी श्रीकृष्ण जयंती 18 ऑगस्ट 2022 रोजी आहे. या दिवसाचं औचित्य साधत जन्मोत्सवासाठी पाळणा सजवला जातो आणि मध्यरात्री 12 च्या ठोक्याला श्रीकृष्णाचा जन्म साजरा केला जातो. आसुरी प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण अवतार घेतल्याचं, हिंदू शास्त्रात सांगितलं आहे. म्हणजेच, नकारात्मकेवर मात करत सकारात्मकतेच्या दिशेनं जाण्याचा दिवस.. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला मुकुट, बासरी, सुदर्शन चक्र, मोराच्या पिसांनी सजवणं अत्यंत शुभ मानले जाते. या गोष्टींचा वापर करून तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळू शकतो.
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 18 ऑगस्ट 2022 गुरुवार रात्री 9 वाजून 21 मिनिटांनी सुरु होईल. तसेच अष्टमी तिथी 19 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 10.50 मिनिटांनी संपेल. धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्ण यांचा जन्म मध्यरात्री झाला होता. त्यामुळे श्रीकृष्ण जयंती 18 ऑगस्टला साजरी केली जाईल. धार्मिक मान्यतेनुसार, श्रीकृष्ण जयंतीला पूर्ण दिवस उपवास ठेवावा आणि गोपाळकाला या दिवशी सोडावा.
जन्माष्टमीचा मुहूर्त
श्रीकृष्ण पूजा मुहूर्त- 18 ऑगस्ट रात्री 12.20 ते 01.05 पर्यंत
पूजा कालावधी- 45 मिनिटं
व्रत पारण वेळ- 19 ऑगस्ट, रात्री 10 वाजून 59 मिनिटानंतर
जन्माष्टमीला खास योग
जन्माष्टमीला या वर्षी वृद्धि आणि ध्रुव योग तयार होत आहे. वृद्धि योग 17 ऑगस्ट 2022 रात्री 8 वाजून 56 मिनिटांनी सुरु होईल आणि 18 ऑगस्ट रात्री 8 वाजून 41 मिनिटांनी सुरु होईल. ध्रुव योग 18 ऑगस्ट 2022 रात्री 8 वाजून 41 मिनिटांनी सुरु होईल आणि समाप्ती 19 ऑगस्ट रात्री 8 वाजून 59 मिनिटांनी संपेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)