आजचे राशिभविष्य | गुरुवार | 10 जानेवारी 2019

जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल.

Updated: Jan 10, 2019, 07:52 AM IST
आजचे राशिभविष्य | गुरुवार | 10 जानेवारी 2019  title=

मेष : नव्या माणसांशी भेटण्याचा योग आहे. अनेकजण तुमच्या मदतीला येतील. लोक तुम्हाला सहानभुती दाखवतील. आज तुम्ही खूप संवेदनशील असाल. प्रत्येक गोष्ट करताना त्यातील तथ्य पाहा. प्रेम आणि वैवाहीक संबंधामध्ये सुधार पाहायला मिळेल. जुन्या मित्रांची मदत मिळेल. कार्यक्षेत्रात कोणता तरी नवा प्रोजेक्ट मिळेल. सामाजिक कार्यक्रमात भाग घेऊ शकता. 

वृषभ : नोकरदार वर्गात कामाच्या ठिकाणी पहिल्यापेक्षा अधिक सुधारणा होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही महत्त्वाची कामे उरकून घ्याल. नशिबाची साथ मिळेल. जवळच्या आणि सोबत काम करणाऱ्यांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात प्रगतीच्या संधी येण्याचा योग आहे. 

मिथुन : आज तुम्ही विचार पूर्वक निर्णय घ्या. पुढे जाल. आपल्या विचारांशी दुसऱ्यांना सहमत करुन घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कोणत्या तरी नव्या ठिकाणी जाण्याचा योग आहे. नव्या लोकांशी ओळख होईल. यामुळे तुम्हालाच फायदा होईल. तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढे यशस्वी व्हाल. या राशितील बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. 

कर्क : तुमच्यासाठी चांगला दिवस ठरु शकतो. तुमचा उत्साह वाढू शकतो. घर आणि आजुबाजूच्या वस्तूंचा कंट्रोल तुमच्याकडेच असेल. पैशांच्या प्रकरणात थोडा विचार केलात तरच उपयोग होईल. पगार, खर्च आणि पैशांच्या प्रत्येक प्रकरणात बारीक सारीक विचार करा. मोठे निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत गुंतवणूक करण्याचा विचार करु शकता. कोणत्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे प्लानिंग करु शकता. 

सिंह : मोठी कामं पूर्ण करण्याकडे तुमचे लक्ष असेल. पैसे आणि इच्छाशक्ती आज वाढू शकते. तुमची बरीच कामे आज पूर्ण होतील. काही नवीन आणि मजेदार अनुभव तुम्हाला मिळतील. आज तुम्ही व्यस्त आणि सक्रीय असाल. जोडीदारासोबतच्या नात्यात सुधार होण्याची शक्यता आहे. नवी नोकरी किंवा व्यवसायाची रुपरेखा आखाल. ज्यामध्ये पुढे जाऊन काही बदल होऊ शकतात. 

कन्या : जे काम तुम्हाला करायचे आहे किंवा जी जबाबदारी तुम्हाला मिळाली आहे त्याचा आनंदाने स्वीकार करा. सर्व काही सुरूळीत पार पडेल. तुमच्या कामातून इतरांनाही प्रेरणा मिळेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. कोणती तरी नवी गोष्ट शिकाल. नात्यांच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक राहाल. ऑफिस किंवा घरच्या ठिकाणी काही नवीन बदल घडतील. 

तुळ : आज तुम्ही आनंदीत राहण्याचा प्रयत्न कराल. जे लोक तुम्हाला फसवू इच्छित आहात त्यांचा खोटेपणा तुमच्यासमोर येईल.  तुमच्या मनातील सांगण्याचा प्रयत्न केल्यास प्रेयसी/ प्रियकरापर्यंत भावना पोहोचतील. मित्र, नातेवाईक, प्रेमीसोबत घालवलेला क्षण फायदेशीर ठरू शकतो. कोणत्यातरी खास व्यक्तीचा सल्ला तुम्हाला आयुष्यात सकारात्मक बदल आणू शकतो. 

वृश्चिक : चांगल्या माणसांशी तुमची ओळख होईल. ज्यामुळे तुम्हाला फायदाच होईल. मित्रांसोबत वेळ घालवाल. आज केलेल्या व्यवसायाचे करार फायदेशीर ठरतील. व्यवसाय चांगला चालेल. घरचे वातावरणही आनंदी असेल. परिवारातूनही तुम्हाला मदत मिळू शकते. 

धनु : तुमच्या भावना योग्य रितीने मांडू शकाल. मुलाखत किंवा नव्या नात्याबद्दल आज विचारणा झाली तर ते चांगल राहील. परिवार किंवा मित्रांकडे काही बोलायच राहील असले ते देखील बोलता येईल. गंभीरतेने केलेली चर्चा खूप काही प्रकरणे सोडवण्यास मदत करेल. कार्यक्षेत्रात खूप काही मिळवण्यात यश मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

मकर : छोटी मोठी यात्रा आणि महत्त्वपूर्ण बोलणी होऊ शकतील. कोणत्या तरी खास व्यक्ती तुमचे काम पाहतील. तुमच्या बुद्धीने महत्त्वाचे काम पूर्ण कराल. जास्त मेहनत करणारे काम देखील सहज पूर्ण कराल त्यामुळे सकारात्मक वाटेल. पैशांची काळजी दूर होण्याची गरज आहे. आज कोणती तरी चांगली बातमीही मिळू शकेल. घर आणि ऑफिसमध्ये केलेल्या बदलाशी तुम्ही सहमत असाल. 

कुंभ : आज तुम्ही लोकांना भेटणे आणि त्यांच्याशी गप्पा मारण्यात यशस्वी व्हाल. आजुबाजूंच्या लोकांवर लक्ष ठेवा. ऑफिसमध्ये तुम्हाला जबाबदारीचे काम मिळेल. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी तुम्ही कामात व्यस्त राहाल. परिवारासोबत चांगली कामं होतील. मोठे भाऊ आणि मित्रांची मदत मिळेल. 

मीन : स्वत:वर विश्वास ठेवा आणि पुढे येऊन काम करा. व्यवसाय आणि नोकरीतील खास काम पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला राहील. आज तुम्ही खूप प्रकरणात यशस्वी व्हाल. पैशांची स्थिती सुधारेल आणि प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील. पैसे कमावण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. 

दीपक शुक्ला