close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | गुरुवार | ७ मार्च २०१९

या राशीच्या व्यक्तींसाठी दिवस चांगला. 

Updated: Mar 7, 2019, 09:03 AM IST
आजचे राशीभविष्य | गुरुवार | ७ मार्च २०१९

मेष- धनलाभ होण्यचा योग आहे. नोकरीच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. नोकरीत प्रगती होईल. आत्मविश्वास वाढलेलाच असेल. दिवस चांगला आहे. जास्तीत जास्त गोष्टींमध्ये नुकसान होण्यापासून दूरच राहाल. जवळच्या व्यक्तींसोबत असणारं नातं सुधारेल. 

वृषभ- तुमचा उतरांवर प्रभाव पडेल. कोणा एका कार्यक्रमाचं निमंत्रण मिळेल. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. एक असा प्रवासयोग आहे, ज्याचा फायदा भविष्यात नक्की होईल. घरी आराम करण्याला प्राधान्य द्याल. जुन्या वादांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न कराल. 

मिथुन- आर्थिक स्थिती सुधारेल. अर्थार्जनाच्या काही चांगल्या संधी मिळतील. ज्यामुळे तुम्ही स्वत:सुद्धा थक्क व्हाल. हल्लीच काही नव्या लोकांशी मैत्री होईल. महत्त्वाच्या गोष्टींकडे गांभीर्यानेच पाहा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. 

कर्क- सर्व लक्ष हे करिअरवरच असेल. जास्त संवेदनशील असाल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. दिवसभरात काही चांगल्या घटना घडतील. ज्या गोष्टींकडे अडचण म्हणून पाहात आहात, तिच गोष्ट पुढे जाऊन एक सकारात्मक बदल घडवून आणेल. 

सिंह- सामाजिक वर्तुळात तुम्ही बऱ्यापैकी सक्रिय असाल. कोणत्याही कठिण प्रसंगी अनेकजण तुमच्या मदतीसाठी उभे राहतील. काही मंडळी तुम्हाला कळू न देता मदत करतील. चांगला काळ सुरू आहे. कायदेशीर कामांमध्ये यश मिळेल. आर्थिक अडचणी दूर होतील. 

कन्या- दिवस सामान्य असेल. देवाणघेवाण आणि गुंतवणूकीच्या बाबतीत नव्या योजना आखाल. आजूबाजूला बराच गोंधळ असेल. कुटुंबासोबत बाहेर जाण्याची इच्छा होईल. काम आणि मेहनत जास्त करा, यश मिळेलच. 

तुळ- कामांमध्ये अडचणी येणार नाहीत. काही व्यक्ती तुमच्याकडून फार अपेक्षा ठेवत आहेत. इतरांच्या गरजा पूर्ण करण्याकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागेल. समोर येणाऱ्या संधी गमावू नका. चांगला काळ सुरू आहे. वेळच्या वेळी कामं पूर्ण होतील. 

वृश्चिक- कार्यभार, काम आणि पगारवाढ होईल. नवीन ठिकाणी जाण्याचे योग आहेत. काही नव्या गोष्टी शिकाल. प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबतचं नातं आणखी सुरेख होईल. नाती मजबूत होतील. मनात फार कोलाहल असेल. पण, त्याचा तुम्हाला फायदाही असेलच. 

धनु- महत्त्वाच्या लोकांशी असणारं नातं आणखी दृढ होईल. पैशांची स्थिती पाहून मात्र थोडा विचार कराल. काही नव्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जातील. या जबाबदाऱ्यांचा हसतमुखाने स्वीकार केलात तर फायदा होईल. कुटुंबात ऐक्य राहील. 

मकर- नोकरी आणि व्यवसाटाच्या बाबतील काही चांगल्या गोष्टी घडण्याची चिन्हं आहेत. कोणा एका महत्त्वाच्या विषयावर कुटुंबाशी चर्चा कराल. काही महत्त्वाची कामं आज पूर्णत्वास न्यावी लागतील. गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा कोणाला मदत करण्यापूर्वी कोणाचा तरी सल्ला अवश्य घ्या. 

कुंभ- जुनी नाती आणखी दृढ करण्याचा प्रयत्न कराल. नवं काम हाती घेण्यापूर्वी तुम्हाला दैनंदिन आयुष्य़ातील काही जबाबदाऱ्याही पार  पाडायच्या असतात हे विसरु नका. धनलाभ होण्याची शक्यता आहे. विचारात असणारी कामं पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. 

मीन- आयुष्यात एखादा मोठा बदल होऊ शकतो. अडचणू दूर होतील. मनात ज्या गोष्टी आहेत, त्यावर इतरांच्या साथीने विचार करणं फायद्याचं ठरेल. वेळ जास्त आहे, अनेक गोष्टी निकाली निघतील. नव्या योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे.