Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य करणार धून राशीत प्रवेश! 16 डिसेंबरपासून 'या' तीन राशींचं बदलणार नशीब

Surya gochar in Dhanu :  ग्रहांचा अधिपती सूर्य आज धनु राशीत गोचर होत असल्याने अनेक राशींच्या लोकांना याचा लाभ होणार आहे. ग्रहांचा अधिपती सूर्य 16 डिसेंबर 2023 रोजी धनु राशीत प्रवेश (Surya Transit In Sagittarius) करत आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Dec 3, 2023, 06:10 PM IST
Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य करणार धून राशीत प्रवेश! 16 डिसेंबरपासून 'या' तीन राशींचं बदलणार नशीब title=
Sun transit in Sagittarius surya gochar 16 december 2023

Surya Transit In Sagittarius : सर्व नऊ ग्रहांमध्ये सूर्य ग्रहाला विशेष महत्व आहे. म्हणूनच सूर्य जेव्हा आपली चाल बदलतो तेव्हा त्याचा परिणाम इतर राशींवर दिसून येतो. धनु राशीत सूर्य संक्रमण (Surya Gochar) होत आहे. ग्रहांचा अधिपती सूर्य आज धनु राशीत गोचर होत असल्याने अनेक राशींच्या लोकांना याचा लाभ होणार आहे. ग्रहांचा अधिपती सूर्य 16 डिसेंबर 2023 रोजी धनु राशीत प्रवेश (Surya Transit In Sagittarius) करत आहे. यामुळे कोणत्या राशीवर परिणाम होणार? आणि कोणाचं नशिब बदलणार? पाहुया...

धनु राशी

धनु राशीमध्ये सूर्य देवाचा प्रवेश तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. सूर्य देव तुमच्या राशीतच भ्रमण करेल, त्यामुळे धनु राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक प्रकारचे लाभ होतील. शुभ प्रभाव वाढतील आणि तुम्हाला तुमच्या करिअरशी संबंधित शुभ परिणाम मिळतील. तुमच्या व्यवसायातील कमाई वाढेल आणि तुम्हाला शुभ नफा मिळेल.

मीन राशी

मीन राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. बँक बॅलन्स वाढेल आणि तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तसेच, यावेळी व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. त्याचबरोबर भावंडांची साथ देखील तुम्हाला मिळेल.

कन्या राशी

करिअरच्या कमाईमुळे यश मिळेल आणि मेहनतीचे फळ यशाच्या रूपात मिळेल. तसेच, जर तुम्ही रिअल इस्टेट, प्रॉपर्टी आणि हॉटेल लाइनमध्ये गुंतलेले असाल तर तुम्हाला विशेष फायदे मिळू शकतात. ऑफिसमध्ये आणि समाजात तुम्हाला सन्मान मिळेल. तर आयुष्यात नवीन व्यक्ती देखील येऊ शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)