सूर्य आणि बुध युतीमुळे बुधादित्य राजयोग, 'या' राशींची आर्थिक स्थिती सुधारणार

सूर्यानंतर बुध ग्रहाने राशी बदलली आहे. हा ग्रह बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा कारक मानला जातो. 

Updated: Jul 18, 2022, 01:06 PM IST
सूर्य आणि बुध युतीमुळे बुधादित्य राजयोग, 'या' राशींची आर्थिक स्थिती सुधारणार title=

Astrology July 2022: सूर्यानंतर बुध ग्रहाने राशी बदलली आहे. हा ग्रह बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा कारक मानला जातो. 17 जुलैला बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. तर 16 जुलैपासून महिनाभरासाठी सूर्य या राशीत आहे. त्यामुळे कर्क राशीत बुधादित्य योग तयार झाला आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशीसाठी बुध ग्रहाचा हा बदल शुभ मानला जातो.

मेष: या राशीच्या गोचर कुंडलीतील चतुर्थ स्थानात बुधादित्य योग तयार होत आहे. या स्थानाला माता आणि भौतिक सुखाचं स्थान मानलं जातं. जर तुम्ही वाहन किंवा प्रॉपर्टी विकत घेण्याचा विचार करत असाल तर या काळात खरेदी करू शकता. या काळात तुम्हाला नविन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. तसेच मान सन्मान देखील वाढेल. त्याचबरोबर आईकडून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

कर्क: आपल्या राशीच्या लग्न भावात बुधादित्य योग तयार होत आहे. त्याचबरोबर धनभावात सूर्य विराजमान आहेत. या काळात अक्समित धनलाभ होण्याची शक्यता आहे. मेहनतीला या काळात यश मिळेल. त्याचबरोबर केलेल्या कामाचं कौतुक होईल.

कन्या: या राशीच्या 11 व्या स्थानात बुधादित्य योग तयार होत आहे. या स्थानाला मिळकत आणि लाभाचं स्थान म्हटलं जातं. या काळात मिळकतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवे आर्थिक मार्ग निर्माण होतील. या काळात व्यवसायात गुंतवणूक करू शकता. त्याचबरोबर प्रॉपर्टी विकत घेण्यास अनुकूल काळ आहे.

तूळ: या राशीच्या गोचर कुंडलीतील दशम स्थानात बुधादित्य योग तयार होत आहे. या स्थानाला कर्म आणि नोकरीचं स्थान मानलं जातं. या काळात व्यवसायात चांगला लाभ मिळू शकतो. नव्या नोकरीचे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच जिथे नोकरी करत असाल, अशा ठिकाणी प्रमोशन किंवा इन्क्रिमेंट मिळू शकते. या काळात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x