Surya Gochar | 15 'मे'पासून बदलणार 3 राशींचं नशीब, पैसा, प्रसिद्धी आणि मिळणार बरंच काही

Surya Gochar | 3 राशींवर सूर्यदेवाची कृपा, पैसा-प्रसिद्धीसोबत मिळणार बऱ्याच गोष्टी, पाहा तुमची रास लकी आहे का?

Updated: May 8, 2022, 11:55 AM IST
Surya Gochar | 15 'मे'पासून बदलणार 3 राशींचं नशीब, पैसा, प्रसिद्धी आणि मिळणार बरंच काही title=

मुंबई : कुंडलीमध्ये सूर्याची स्थिती ही मान-सन्मान, प्रसिद्धी आणि यश यासाठी महत्त्वाची असते. कोणाच्या कुंडलीत सूर्य जर कमजोर असेल तर त्याची कामं बिघडतात. सूर्य ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी एक महिन्याचा कालावधी घेतो. 

15 मे रोजी सूर्य वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. याचा फायदा 12 पैकी कोणत्या राशींना होणार? कोणाला धनलाभ होणार? कोणाच्या करिअरमध्ये फायदा होणार याबाबत सविस्तर जाणून घेऊया. 

कर्क- कर्क राशीच्या लोकांवरही सूर्य संक्रमणाचा प्रभाव दिसून येईल. या राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. कर्क राशीचे लोक संपत्ती जमा करण्यात यशस्वी होतील. 

या कालावधीत गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे. जे सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांनाही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता.

धनु - ज्योतिष शास्त्रानुसार धनु राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ खूप उपयुक्त राहील. आर्थिक लाभाच्या बाबतीत भाग्य तुम्हाला साथ देईल. 

तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर हा काळ अनुकूल राहील. प्रत्येक कामात भाग्य तुमची साथ देईल. या काळात परदेशात जाण्याची शक्यता आहे. वडिलांसोबतचं नातं अधिक दृढ होईल. 

मीन - मीन राशीच्या लोकांना नोकरीत यश मिळू शकतं. मीन राशीच्या लोकांसाठीही हा काळ फायदेशीर ठरेल. व्यावसायिक जीवनात यश मिळू शकतं. या काळात परदेश प्रवासाची शक्यता आहे. 

मेहनतीचे योग्य फळ मिळू शकेल. तुमचे करिअर पुढे नेण्यासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न विलक्षण ठरतील.कुटुंबीयांचे सहकार्य  प्रत्येक कामात मिळेल.