'हे' 7 संकेत सांगतात तुम्ही कधी होणार मालामाल ?

तुम्ही अनुभवत आहात काही गोष्टी, तर 'ते'  तुम्ही श्रीमंत होणार असल्याचे संकेत   

Updated: Jun 1, 2022, 08:58 AM IST
'हे' 7 संकेत सांगतात तुम्ही कधी होणार मालामाल ? title=

मुंबई :  आजच्या या सतत बदलत्या जगात सर्वात जास्त महत्त्व रुपयांना आहे. कारण 'पैशांचं ठोंग कोणाला करता येत नाही...' असं कायम आपण ऐकतो. लोक आशांच्या लोकांची ओळख ठेवतात ज्यांच्याकडे अधिक पैसा असेल. देव संधी प्रत्येकाला देतो, पण त्या संधीचं सोनं करणं आरल्या हातात असतं. जर तुमच्या आयुष्यात देखील उत्तम दिवस येणार असतील, तर त्याचे संकेत आपल्याला मिळतात. असे काही संकेत आहेत, ज्यामुळे तुम्हाला कळेल तुमचं नशीब कधी बदलेल आणि तुम्ही कधी मालामाल होणार... 

या 7 संकेतांमुळे तुम्ही होणार मालामाल?
- जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या रांगेत दिसल्या किंवा त्या अन्नपदार्थांवर लागल्या तर ते खूप शुभ लक्षण आहे. आता तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होणार आहे हे समजून घ्या.

- पक्षी तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी घरटे बनवत असतील असतील तर ही गोष्ट अत्यंत शुभ आहे. महत्त्वाचं म्हणजे घरटे जर उत्तर दिशले असेल, तर ते अधिक शुभ मानलं जातं.

- जर सकाळ तुमच्या दारात एखादी गाय येऊन हंबरडा फोडत असेल, तर हा एक देखील शुभ संकेत आहे. गाय जर तुमच्या दारात आली, तर तिला खाऊ पिऊ घाला. असं केल्यास तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होईल. 

- घरात असलेल्या तुळसीला पण फार महत्त्व आहे. तुमच्या घरातील तुळसीचं रोपटं अधिक घनदाट आणि हिरवं झालं असेल. तर तुमचं नशीब बदलू शकतं. 

- सकाळी घराबाहेर पडल्यास जर तुम्हाला कोणी केर काढताना दिसलं तर, समजून घ्या जीवनात नक्कीचं काही तरी चांगलं होणार आहे. 

- जर सकाळी घराबाहेर पडल्यास, तुम्हाला पैसे दिसले, तर तुम्हाला देखील लवकरचं धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)