आजचे राशीभविष्य | शनिवार | 19 जानेवारी 2019

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Jan 19, 2019, 08:14 AM IST
आजचे राशीभविष्य | शनिवार | 19 जानेवारी 2019 title=

मेष : कोणाची तरी मदत करण्यास तुम्ही पुढाकार घ्याल. काही लोकांच्या उदारतेमुळे तुमची कामेही पूर्ण होतील. अशा लोकांपासून तुम्ही प्रभावित व्हाल. तुम्हाला नवा अनुभव मिळू शकतो. नव्या जागी प्रवासाचा योग आहे. तुमच्या कामकाजात काही बदल ही होतील. सामाजिक क्षेत्रातही थोडा बदल होऊ शकतो. 

वृषभ : नशिबाची साथ मिळेल. कुठूनही पैसे मिळतील. प्रेमी किंवा जोडीदारासोबत काही वेळ घालवा. अविवाहीत लोकांना विवाहाचे प्रस्ताव येतील. लव्ह मॅरेज करण्यासाठी लोकांना परिवारातून मदत मिळेल. व्यवसायात भागीदाराकडून धन लाभ होण्याचा योग आहे. व्यवसायात फायदा मिळेल. नवे प्लानिंग फायदेशीर ठरेल. नवी योजना बनवाल. नोकरीच्या जागेत बदल होण्याचा योग आहे. 

मिथुन : पैशांच्या प्रकरणात वेळेवर मदत मिळेल. नोकरीमध्ये बढती मिळण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. काही नव्या लोकांशी भेटीगाठी होतील. प्रेम संबंध आणि दृढ होतील. तुम्ही जितकी ज्यांची मदत कराल तेवढी तुम्हाला भविष्यात परत मिळेल. वयस्कर माणसांशी झालेल्या गप्पा खूप मदत करणाऱ्या ठरतील. 

कर्क : चांगल्या माणसांशी भेटीगाठी होतील. मोठ्या योजना आणि विचारांवर गप्पा होतील. कोणत्याही संधीचा फायदा उठवण्यास उशीर करु नका. नोकरी किंवा नवी संधी मिळेल त्याकडे दुर्लक्ष करु नका. त्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकते. नात्यांच्या प्रकरणात काही खास प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. सर्वांशी सहयोगाने वागा. वैवाहीक आयुष्य आनंदात असेल. 

सिंह : आज तुम्ही सकारात्मक पद्धतीने जास्त विचार कराल. आव्हानांचे एक सत्र संपेल. धर्म कर्माची आवड आणखी वाढेल. पैशांच्या काही विशेष प्रकरणात सल्ला घ्या. परिवारासोबत राहण्यासाठी वेळ मिळेल. अनेक प्रकारचे रचनात्मक विचार येऊ शकतात. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. 

कन्या : करियरमध्ये पुढे जाण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी काही नव्या योजना बनवू शकता. ऑफिसमध्ये काम देखील जास्त राहील. पण तुम्ही काम वाटून घेतलात तर सहज पूर्ण होईल. पैसे कमावण्याच्या काही चांगल्या संधी मिळतील. तुम्ही आनंदीत राहाल. व्यवसाय वाढवण्यास मदत होईल. व्यवसायात मुलांकडूनही तुम्हाला मदत मिळेल. वैवाहीक आयुष्यात सुखाचा वेळ जाईल. 

तुळ : नव्या जबाबदारी तुम्हाला मिळतील. चतुराईने काम पूर्ण कराल. चांगल्या कामांमुळे तुम्हाला सन्मान मिळेल. खरेदी करताना स्वत:वर संयम ठेवा. त्यामुळे तुम्हालाच फायदा होईल. अनेक जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही व्यस्त राहाल. त्यामध्येच तुमचा जास्त फायदा असेल. परिवारात शांती मिळेल. पैशांची स्थिती थोडी सुधारेल.  मांगलिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. 

वृश्चिक : मित्रांशी भेटीगाठी होतील आणि मदत देखील मिळू शकते. पैशांच्या स्थितीत सुधार आणण्याचा प्रयत्न कराल. नोकरी किंवा व्यवसायात काही अशी कामे होतील ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. अडकलेला पैसा तुम्हाला परत मिळेल. स्वत: ला वेळ देण्याचा प्रयत्न करा. जबाबदारी वर लक्ष्य द्या. कोणत्या तरी चांगल्या सवयीने तुम्हाला धन लाभ होईल. मित्रांशी भेटी होतील. 

धनु : तुम्ही तुमच्या कामाकडे बारिकीने लक्ष द्या. नोकरी किंवा व्यवसायात फायदा असणाऱ्या ऑफर्स मिळू शकतात. नव्या योजनेवर विचार कराल आणि त्या अनुषंगाने दिवस चांगला जाईल. तुमचे सकारात्मक वागणे लोकांना आवडेल. दुसऱ्यांच्या मदतीने कोणते तरी मोठे काम वेळेआधीच होईल. शैक्षणिक आणि कायदेशीर प्रकरणांत यश मिळेल. 

मकर : ऑफिस आणि व्यवसायात तुमची ईमेज वाढेल. कोणता प्रोजेक्ट, गुंतवणूक किंवा नोकरीत मोठा निर्णय घेण्याचा निर्णय घ्याल. जो काही निर्णय घ्याल तो तुमच्या बाजूनेच असेल. ऑफिसचे खास काम तुम्ही नव्या पद्धतीने पूर्ण कराल. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्ही सोबतच्यांवर प्रभाव पाडू शकाल. 

कुंभ : तुम्ही स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊले उचलाल. सोबत चालणाऱ्यांसाठी देखील मदतगार ठराल. व्यवसायात लोकांची मदत मिळेल. कोणती मोठी संधी मिळू शकते. पैशांचे कोणतेही प्रकरण असेल ते संपवून टाका. आज तुम्ही व्यवसायात कोणती तरी मोठी योजना बनवाल. वैवाहीक आयुष्यात मधुरता येईल. 

मीन : अधिक प्रकरणांत दिवस चांगला राहील. कठीण काम देखील सहज पूर्ण होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांच्या तुमच्या भेटीगाठी होतील ते तुमच्यासाठी मदतगार ठरतील. पगार वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचै कौतूक होईल. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. चांगले वातावरण असेल. बढती मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचा विचार कराल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल.