close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | गुरुवार | ०५ सप्टेंबर २०१९

जाणूघ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस 

Updated: Sep 5, 2019, 08:58 AM IST
आजचे राशीभविष्य | गुरुवार | ०५ सप्टेंबर २०१९

मेष- धनलाभ होण्याची शक्यता आहे. जास्त मेहनत करावी लागू शकते. नोकरीमध्ये प्रगती होणार आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. विवाह प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. 

वृषभ - तुमच्या कामाचा इतरांवर प्रभाव पडेल. कुटुंबाची साथ मिळेल. दूरच्या व्यक्तींची मदत मिळेल. आज एखादा प्रवास घडेल ज्याचा भविष्यात फायदा होणार आहे. कुटुंबाचं समर्थनही मिळेल. 

मिथुन- आर्थिक परिस्थितीत फायदा होईल. अर्थार्जनाच्या संधी मिळतील. आज दृष्टीकोन सकारात्मक ठेवा. सर्वकाही ठीक होणार आहे. 

कर्क- तुमचं पूर्ण लक्ष करिअरवर असेल. काही सुखद घटनांना सामोरे जाल. आयुष्यात काही महत्त्वाचे आणि सकारात्मक बदल घडतील. 

सिंह- सामाजिक वर्तुळात बऱ्याच अंशी सक्रिय असाल. एखाद्या कठीम परिस्थितीत तुम्हाला इतरांची साथ मिळेल. कायदेशीर कामांमध्ये यश मिळणार आहे. नवी जबाबदारी मिळेल. 

कन्या- आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. देवाणघेवाणीचे नवे बेत आखाल. एकाग्रता शिखरावर असेल. अनेक कामांची जबाबदारी एकाच वेळी तुमच्यावर सोपवण्यात येईल. 

तुळ- तुमची कामं कुठेही अडणार नाहीत. इतरांकडून तुम्ही जास्तच अपेक्षा ठेवाल. सोबत असणाऱ्यांची मदत मिळेल. वेळेत कामं पूर्ण होतील. 

वृश्चिक- पद, वेतन आणि तुमचे अधिकार वाढतील. कोणा एका नव्या ठिकाणी जाण्याची इच्छा होईल. तुमचे संबंध मजबूत होतील. वास्तवदर्शी विचार करा, फायदा होईल. 

धनु- महत्त्वाच्या व्यक्तींसोबत चांगला मेळ साधाल. काही नव्या जबाबदाऱ्यांचा आनंदाने स्वीकार कराल. कुटुंबात एकजूट ठेवा. 

मकर- व्यापार आणि नोकरीच्या बाबतीत काही चांगलं होण्याचे संकेत मिळतील. एखाद्या खास गोष्टीविषयी चर्चा कराल. नवं घर खरेदी करण्याची इच्छा होईल. धार्मिक यात्रेचा योग आहे. 

कुंभ- जुन्या संबंधांना अधिक दृढ करण्याची इच्छा होईल. एखादं जास्तीचं काम हाती घ्याल. एखादी जबाबदारी पार पाडाल. वडिलांची एखाद्या महत्त्वाच्या कामात मदत मिळेल. 

मीन- तुमच्या आयुष्यात एखादा महत्त्वाचा आणि मोठा बदल होईल. अडचणी दूर होतील. प्रेमसंबंधामध्ये चांहला काळ आहे. जास्तीत जास्त बाबतीत यशस्वी ठराल.