close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | गुरुवार | १२ सप्टेंबर २०१९

जाणून घ्या कसा आहे, तुमचा आजचा दिवस 

Updated: Sep 12, 2019, 08:21 AM IST
आजचे राशीभविष्य | गुरुवार | १२ सप्टेंबर २०१९

मेष - धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनेक काळ चालणाऱ्या कामाचा फायदा होईल. काही महत्त्वाच्या योजना आज आखू शकता. अविवाहितांचा विवाह ठरु शकतो. तुमच्या बुद्धीने कामं पूर्ण कराल. मित्र, कुटुंबाची मदत मिळेल. चांगली बातमी आज मिळू शकते. आनंदी राहाल. बेरोजगार लोकांसाठी दिवस चांगला आहे.

वृषभ - कामासह तुमची जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. दिवसभर व्यस्त राहाल. व्यवसायातील काही गोष्टी समजदारीने सोडवाल. यश मिळेल. ऑफिसमध्ये शांती राहील. प्रवासाची योजना आखू शकता. 

मिथुन - ऑफिस किंवा व्यवसायात नवीन गोष्टी करु शकता. कामात नवीन प्रयोग केल्यास यश मिळेल. दिवस ठिक आहे. अधिकारी तुमचं कौतुक करु शकतात. जोडीदारासोबत वेळ घालवाल. जोडीदारामुळे फायदाही होऊ शकतो. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. कौटुंबिक समस्यांवर मार्ग मिळेल. प्रॉपर्ट्रीची कामं पूर्ण होऊ शकतात.

कर्क - अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. पैशांसंबंधी प्रश्न सुटू शकतात. समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी मित्रांची मदत मिळू शकते. कामासंबंधी चांगल्या आणि व्यावहारिक कल्पना तुम्हाला सुचू शकतात. कोणतेही मतभेद असल्यास ते लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवहारकुशलता आणि सहनशक्तीने काम केल्यास गोष्टी अधिक सोप्या होतील.

सिंह - आर्थिक स्थितीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही खुश व्हाल. महत्वाकांक्षा वाढेल. तुमच्या अपेक्षा संतुलित ठेवा. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. ऑफिसमधील ताण कमी होईल. कठिण कामंही तुम्ही मेहनत आणि समजदारीने पूर्ण कराल. एखादं मोठं टेन्शन कमी होईल.

कन्या - स्वत:कडे लक्ष द्या. नवीन कपडे खरेदी करु शकता. सक्रिय राहाल. कामं पूर्ण होतील. नवीन कल्पना सुचू शकतात. इनकम आणि खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल. यशासाठी धैर्य ठेवा. मित्रांची मदत मिळू शकते.

तुळ - नोकरी, पैसे आणि करियरच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. प्रमोशन किंवा नवीन नोकरीच्या प्रयत्नांत असाल तर ते साध्य होऊ शकते. उत्साही राहाल. नवीन लोकांशी संपर्क होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अनेक लोक तुमच्याशी सहमत असतील. अनेक लोक तुमची मदत करण्यासाठी तयार राहतील.

वृश्चिक - महत्त्वाचं काम करु शकता. या कामामुळे मोठा फायदा होऊ शकतो. मेहमत घ्यावी लागेल. जुनी कामं पूर्ण केल्यास फायदा होईल. नवीन काम सुरु करण्याआधी रखडलेली कामं पूर्ण करा. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. 

धनु - विचार केलेली कामं करण्यास सुरुवात करा. फायदा होईल. उत्साही वाटेल. सामाजिक कामांसाठी दिवस चांगला आहे. कुटुंबाची कामं पूर्ण करावी लागतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. गुंतवणुकीची योजना आखाल. धनलाभ होऊ शकतो. उधार दिलेले पैसे मिळू शकतात. ऑफिस किंवा व्यवसायात तुमच्यासाठी घेतल्या गेलेल्या निर्णयाने फायदा होईल.

मकर - दिवस खास आहे. काही अशा गोष्टी समोर येतील ज्याचा येणाऱ्या दिवसांमध्ये फायदा होईल. कठिण गोष्टी सोडवण्यासाठी दिवस चांगला आहे. तुमच्या समजदारीचा वापर करा. कामाच्या ठिकाणी ओळखीच्या लोकांची मदत मिळेल. दिवस शुभ आहे. एखादा आजार असल्यास त्यात आराम मिळेल. नशिबाची साथ मिळेल.

कुंभ - धैर्याने कामं करा. दिवसभर पैशांबाबत विचार कराल. प्रॉप्रर्टीच्या कामात धनलाभाची शक्यता आहे. पुढे जाण्यासाठी काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. दररोजची कामं अधिक असतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. 

मीन - आज कोणतेही काम कराल त्यात फायदा होईल. मनात पैशांसंबंधी अनेक विचार येतील. परंतु लगेचच कोणतंही पाऊल उचलू नका. कागदोपत्री कामांकडे लक्ष द्या. प्रवासासाठी दिवस चांगला आहे. 

- डॉ. दीपक शुक्ल