आजचे राशीभविष्य | रविवार | ४ ऑगस्ट २०१९

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस 

Updated: Aug 4, 2019, 12:00 PM IST
आजचे राशीभविष्य | रविवार | ४ ऑगस्ट २०१९ title=

मेष- अनेक दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. स्वत:ची प्रतिमा आणखी प्रभावीपणे सर्वांसमोर ठेवाल. विचाराधीन कामं पूर्ण होतील. विवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जुन्या आजारपणापासून उसंत मिळेल. 

वृषभ- कामाच्या बाबतीत बऱ्याच अंशी व्यग्र असाल. कुटुंबाशी असणाऱे नातेसंबंध आणखी दृढ होतील. अडकलेली कामं पूर्ण होतील. राणीमानात काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. प्रवासयोग आहेत. 

मिथुन- अतिघाईमध्ये कोणतंही काम करु नका. वायफळ खर्चांचा फटका बसू शकतो. नोकरी आणि व्यवसायामध्ये काही अडचणी येतील. आर्थिक व्यवहार सांभाळा. पोटाचे विकार उदभवतील. 

कर्क- नोकरीत काही अडचणी येण्याची शक्यता आहे. दैनंदिन  कामांमध्येही अडचणी येतील. हट्टाला पेटलात तर वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्यात चढ- उतार असतील. झोप कमीच असेल. 

सिंह- कुटुंबात सुखशांती असेल. कामाच्या ठिकाणी एखादा नवा प्रस्ताव समोर येण्याची चिन्हं आहेत. सामाजिक कामांमुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. इतरांचं तुमच्यावर जास्त लक्ष असेल. आर्थिक व्यवहारांमध्ये साथीदाराची मदत मिळेल. 

कन्या- व्यवसायाच प्रगती आहे. कनिष्ठ सहकाऱ्यांचं सह्कार्य लाभेल. काही खास व्यक्तींना भेटण्याची संधी तुम्हाला मिळेल. दैनंदिन कामांतून काहीशी उसंत मिळेल. अपूर्ण कामं पूर्णत्वास न्याल. दिवस थकवणारा असेल. आराम करण्याला प्राधान्य द्या. 

तुळ- नोकरी आणि व्यवसायामध्ये बराच फायदा होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. नशीबाची साथ असल्यामुळे अनेक कामं मार्गी लागतील. इतरांचं मन राखून स्वत:च्या फायद्याचा विचार करा. 

वृश्चिक- व्यवसायामध्ये फायदा होईल. एखादं नवं काम पूर्ण कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा कठीण आहे. कामाच्या ठिकाणी लक्ष विचलीत होईल. विचाराधीन कामं पूर्ण न झाल्यामुळे चीडचीड होईल. 

धनु- व्यवसायामध्ये फायदा होईल. बदलीचा योग आहे. एखादं नवं काम सुरु कराल. आजचा दिवस आव्हानात्मक आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. मसालेदार पदार्थ खाणं टाळा. 

मकर- आज कोणतेही नवे व्यवहार करु नका. पैसे अडकतील. नाती सांभाळा. एखाद्या वादामध्ये अडकण्याची शक्यता आहे. 

कुंभ- आर्थिक चणचण संपेल. वरिष्ठांचं सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी सारी कामं एकट्याच्या बळावर पूर्ण कराल. प्रयत्न करा, अडचणींवर मात कराल. 

मीन- व्यापार वाढवण्याचा विचार करु नका. महागड्या वस्तूंची खरेदी कराल. एखादा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नका. 

marathi news, marathi, marathi news paper, marathi news online, marathi, samachar, marathi latest news,sports news, marathi news, marathi, marathi news online, marathi, samachar, marathi latest news, national news, national news in marathi, national