आजचे राशीभविष्य | गुरूवार | 24 जानेवारी 2019

असा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Jan 24, 2019, 08:01 AM IST
आजचे राशीभविष्य | गुरूवार | 24 जानेवारी 2019  title=

मेष : पैशांची समस्या पहिल्यापेक्षा कमी होईल. तुमच्या स्थितीत पहिल्यापेक्षा सुधारु शकेल. ठरवलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. करियरमध्ये लवकरच तुम्हाला चांगली संधी मिळू शकतात. तुमची एकाग्रता वाढू शकते. कामाशी संबंधित प्लानिंग पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमची कामे होतील आणि त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. तुम्ही ज्या अडचणीत आहात ती समस्या सुटू शकेल. व्यवसाय संबंधित कोर्टाच्या प्रकरणात तुमची बाजू मजबूत असेल. विद्यार्थ्यांना मेहनत घेऊनही परिणाम कमी दिसतील. 

वृषभ : कोणती जुनी समस्या सुटू शकेल. मित्र किंवा जोडीदाराला तुम्ही आश्वासन द्याल. आज तुम्ही कोणाला तरी वेगळ्या पद्धतीने मदत कराल. गरज पडेल तेव्हा तुम्हाला देखील पाहीजे ती मदत मिळू शकेल. तुमला सावधानी बाळगावी लागेल. गुंतवणूकीत धोका पत्करणे टाळा. दिवसभर सावध राहा. विवाह प्रस्ताव अडकू शकतो. काही प्रकरणात तुमचे निर्णय फसू शकतात. विद्यार्थ्यांना चांगला निकाल मिळेल. 

मिथुन : तुम्ही दिलेल्या सल्ल्यावर ऑफिसमध्ये विचार केला जाईल. नव्या काम धंद्यांवर विचार करण्यासाठी दिवस चांगला असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. काही समस्या तुमच्यासोबत काही दिवसांपासून येत होत्या त्या संपतील. तुमचा कोणता तरी मित्र किंवा घरच्या सदस्याचा व्यवहार बदलू शकतो. ते तुम्हाला आज लगेच समजू शकते. आजुबाजूच्या लोकांसोबत काही तणावाचे संबंध असल्यास त्यात तूतू-मैमै होण्याची शक्यता आहे. व्यवसायात खर्चांवर नियंत्रण ठेवावा लागेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. 

कर्क : तुम्हाला धन लाभ होईल. पैसे आणि भावना तुमच्यासाठी खास असतील. आज होणारे बदल तुमच्या बाजूने असतील. नोकरी आणि व्यवसायामध्ये काही चांगल्या घटना घडतील, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तणाव आणि भांडण जेवढी टाळाल तेवढ तुमच्यासाठी चांगल असेल. प्रत्येक प्रकरणावर खुल्या मनाने विचार करा. कामाचा ताण आणि तणावामुळे थोड दमल्यासारख वाटेल. वरिष्ठ तुमच्याशी सहमत असतील. व्यवसाय वाढण्यात यश मिळेल. 

सिंह : तुमच्यासाठी दिवस चांगला असू शकेल. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती करण्याच्या दिशेने दिवसभर काम होईल. आजचे काम तुमच्या यशाशी संबंधित असेल. आई वडीलांच्या तब्ब्येतीची देखील काळजी घ्याल. कोणत्याही प्रकारची शंका मनात ठेवू नका. मनाचे समाधान करण्यासाठी पैशांचा अतिवापर करु नका. वरिष्ठ तुमच्या बोलण्याला महत्त्व देतील. कार्यक्षेत्रात मान सन्मान मिळू शकतो. विद्यार्थ्यांना मेहनतीने यश मिळण्याची शक्यता आहे. 

कन्या : नव्या कामकाजाची योजना बनवू शकता. प्रवास करण्याचा योग आहे. तुमचे पैसे प्रवासासाठी लागू शकतात. घराच्या सामानाची खरेदी होऊ शकते. आज तुम्ही बरीचशी अडकलेली कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात राहाल. यासाठी वेळ द्यावा लागेल आणि प्रयत्नही करावे लागतील. वेळ मिळेल तर थोडा वेळ स्वत: साठी काढण्याचा प्रयत्न करा. व्यस्ततेमुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होईल. खासगी आयुष्यात कोणत्याही प्रकारचा गैरसमजापासून दूर राहा. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. 

तुळ : आज तुमची कमाई आणि खर्च समान राहतील. तुमचा दृष्टीकोन सकारात्मक राहील. दिवस आनंदात जाईल. चालत आलेल्या अडचणी सुटू शकतील. आज तुम्ही प्रयत्न कराल तर यश मिळेल. हळूहळू चालत आलेल्या कामांना गती मिळेल. तुम्ही आर्थिक नियोजनासाठी 2 दिवस आधीच योजना आखली होती, ती तुम्हाला फायदेशीर ठरेल. काही प्रकरणात घाई केलात तर ठरवलेली कामे बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसायात कमी फायदा होईल. बदली होण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक : आज होणाऱ्या भेटी तुम्हाला फायदेशीर ठरतील. जास्तीत जास्त प्रकरणात दिवस शुभ असेल. तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल होतील. जे काम आतापर्यंत बंद होते ते अचानक सुरू होईल. तुम्ही जितक्या लोकांना भेटाल, जितक्या लोकांशी बोलाल तितके यशस्वी व्हाल. नोकरदार वर्गातील मंडळी कोणत्यातरी निर्णयामध्ये गोंधळलेली असतील. व्यवसायात फायदेशीर करार होतील. काही निर्णय आज देखील अडकू शकतील. नव्या व्यवसाय किंवा नोकरीची ऑफर तुम्हाला मिळू शकेल. 

धनु : नव्या कामांची योजना बनवू शकाल. आजुबाजूच्या आणि सोबतच्या लोकांची मदत मिळू शकेल. दिवस चांगला जाईल. कोणती तरी चांगली बातमी मिळेल. हलका आजार उद्भवू शकतो. नवे ऑफील किंवा दुकान खरेदी करण्याचे मन होईल. व्यवसायासाठी प्रवासाचा योग आहे. 

मकर : आज कामाच्या गोष्टी जास्त होतील. जितकं शक्य होईल तुमचा विचार सकारात्मक ठेवा. तुमचा सकारात्मक व्यवहार परिस्थिती देखील सकारात्मक बनवेल. तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. वरिष्ठांशी बोलणे आणि व्यवसायातील करारामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकाल. जोडीदाराची मदत मिळेल. जोडीदार तुमच्या भावनेचा विचार करेल. 

कुंभ : करियरमध्ये चांगल्या संधींची शक्यता आहे. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत असलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल.  अडचणी संपण्याचा योग आहे. पैशांच्या प्रकरणातील तणाव किंवा दबाव कमी होऊ शकतो. जोडीदाराकडून सहयोग आणि प्रेम मिळू शकते. तुम्हाला फायदा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्या बाजूने असेल. 

मीन : प्रेम आणि जोडीदाराशी संबध मजबूत होऊ शकतील. आज तुमच्यातील तणाव संपू शकतील. प्रकरण मिटू शकतील. कमाईच्या प्रकरणातील अडसर संपेल. व्यवसाय वाढवण्यासाठी मेहनत केलेल्याचे परिणाम चांगले दिसतील. एखाद्या कामासाठी खूप हट्ट केल्यास तुमचे संबंध बिघडू शकतात. जोडीदाराकडून सन्मान मिळू शकेल. अविवाहीतांसाठी दिवस चांगला राहील. 

- दीपक शुक्ला