Vastu Shastra Tips: हिंदू धर्मात वास्तुशास्त्र, ज्योतिष, आरोग्यशास्त्र यांना विशेष महत्त्व आहे. आरोग्यशास्त्रात शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्याबाबत योगाभ्यास सांगितलेला आहे. तर ज्योतिषशास्त्रात ग्रह-नक्षत्रांची गणना करून भविष्यातील घडामोडींबाबत अंदाज बांधला जातो. वास्तुशास्त्रामध्ये आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम सांगितले आहेत.
आपण नेहमी आपल्याजवळ एक पर्स ठेवतो, ज्यामध्ये आपण आपल्या रोजच्या वापरातील महत्त्वाच्या गोष्टी आणि पैसे ठेवतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, आपण अशा वस्तू आपल्या पर्समध्ये ठेवतो, ज्याचा नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे आपल्यावर आर्थिक संकट येऊ शकते. जाणून घेऊ... कोणत्या आहेत त्या अशुभ गोष्टी, ज्या पर्समध्ये ठेवल्याने जीवनात अडचणी येऊ शकतात.
1. वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही देवतेचे चित्र पर्समध्ये ठेवू नये. जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये देवतेचे चित्र ठेवले तर तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि तुम्हाला जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
2. वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याचा फोटो कधीही पर्समध्ये ठेवू नये. अशी समजूत आहे की जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये मृत व्यक्तीचे चित्र ठेवले तर तुम्हाला संकटांना सामोरे जावे लागू शकते.
3. जेव्हा आपण घरी एकटे असतो तेव्हा अनेकदा कुलूप बंद केल्यावर आपण चावी आपल्या पर्समध्ये ठेवतो. परंतु वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये चावी ठेवल्याने जीवनात नकारात्मकता येते, ज्यामुळे एखाद्याला आर्थिक संकटातून जावे लागते. त्यामुळे विसरूनही चावी पर्समध्ये ठेवू नका.
4. आपल्यापैकी बरेचजण बाजारात जातात, म्हणून खरेदी केल्यानंतर, आपण बिल आपल्या पर्समध्ये ठेवतो. पण वास्तुशास्त्रात जुने बिल ठेवणे अशुभ मानले गेले आहे, त्यामुळे तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो.
5. जर तुम्ही पर्समध्ये बेशिस्तपणे नोटा ठेवत असाला. किंवा अनेक घड्या घालून किंवा चुळगळून ठेवत असाल तर तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तसेच नोटा व नाणी एकाच ठिकाणी ठेवणे देखील अशुभ मानले जाते. ते वेगवेगळ्या कप्प्यात ठेवावे.
वास्तुशास्त्रानुसार नोटा किंमतीच्या क्रमानुसार पर्समध्ये ठेवाव्या. असे केल्याने धनाची देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते. त्यामुळे पैशाची आवक वाढते.
(Disclaimer:या लेखातील माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. 'झी24तास' याची पुष्टी करत नाहीः