How to remove Peepal Tree from Home: हिंदू धर्माच पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. सर्व देवी-देवता पिंपळाच्या झाडात वास करतात, अशी मान्यता आहे. शनिवारी तर आवर्जून पिंपळ वृक्षाची पूजा केली जाते. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात पिंपळाचे झाड खूप शुभ मानले जाते. परंतु घरात पिंपळाचे झाड किंवा रोप ठेवणे चांगले नसतं. त्यामुळे जड वास्तुदोष निर्माण होतात. पण अनेक वेळा घरात पिपळाचे रोप स्वतःच उगवते, जर असे असेल तर त्यासाठी वास्तु आणि ज्योतिषशास्त्रातही उपाय सांगितलेला आहे.
घरात पिंपळाचे झाड उगवले तर करा हे काम
वास्तुशास्त्रात घराच्या अगदी जवळ पिंपळाचे झाड असणे देखील अशुभ सांगितले आहे. उद्यानात, मंदिरात किंवा रस्त्याच्या कडेला पिंपळाचे झाड लावणे चांगले. घरामध्ये किंवा घराजवळ पिपळाचे रोप उगवले तर ते नष्ट करू नका. त्यापेक्षा त्याचे संरक्षण करा आणि मातीसह खणून घ्या आणि योग्य ठिकाणी लावा, जिथे ते वाढू शकेल. म्हणजेच तुमच्या घरासोबतच पिंपळाच्या झाडाचेही रक्षण करा.
Shani Dev Margi: फक्त काही दिवसांचा अवधी, शनिदेव मार्गी होणार असल्याने पाच राशींना होणार फायदा
पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत
धर्म आणि ज्योतिष शास्त्रात पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषत: शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत. असे केल्याने शनिदोष दूर होतो, असा समज आहे. अनेक प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते. अडथळे दूर होऊन कामात यश मिळेल. देवी लक्ष्मीचा पिंपळाच्या झाडावर वास असतो. त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि धन-समृद्धी मिळते, असं शास्त्रात सांगितलं आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)