शुक्र-बुध-शनीमुळे तयार होणार खास राजयोग; 'या' राशी कमावू शकतात बक्कळ पैसा

ज्योतिष्य शास्त्रानुसार, राक्षसांचा गुरू शुक्र देखील सुमारे 26 दिवसांत त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. या ग्रहांमुळे ऑगस्ट महिना खूप खास असणार आहे. सिंह राशीमध्ये शुक्र आणि बुध यांचा संयोग आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 3, 2024, 07:35 PM IST
शुक्र-बुध-शनीमुळे तयार होणार खास राजयोग; 'या' राशी कमावू शकतात बक्कळ पैसा title=

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी प्रत्येक ग्रहाच्या राशीतील बदलाचा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतो. सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात महत्त्वाचा असून तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. सध्या शनी त्याच्या मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशीत स्थित असून शश नावाचा राजयोग निर्माण करतोय. त्याचप्रमाणे ग्रहांचा राजकुमार बुध सुद्धा दर महिन्याला आपली राशी बदलत असतो ज्यामुळे कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होत असतो.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, राक्षसांचा गुरू शुक्र देखील सुमारे 26 दिवसांत त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. या ग्रहांमुळे ऑगस्ट महिना खूप खास असणार आहे. सिंह राशीमध्ये शुक्र आणि बुध यांचा संयोग आहे. त्याचप्रमाणे शनी ग्रह स्थित आहे. बुध, शुक्र आणि शनी एकमेकांसमोर आहेत, समसप्तक राजयोगासह केंद्र त्रिकोण राजयोग तयार करतात. या राजयोगांमुळे काही राशींच्या आयुष्यात महत्त्वाचे क्षण येणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

वृषभ रास (Vrishabha Zodiac)

वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना खूप खास आहे. या काळात वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप फायदा होणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्याबरोबरच संपत्तीतही वाढ होईल. तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला या काळात लाभ मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. 

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीच्या पहिल्या घरात शुक्र आणि बुध आहेत. यावेळी तुमच्या करिअरच्या संदर्भात तुम्ही अनेकदा बाहेर फिरायला जाऊ शकता. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. तुम्हाला प्रचंड फायदे मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. यासोबतच तुम्ही संपत्ती जमा करण्यातही यशस्वी व्हाल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. आरोग्यही चांगले राहील.

वृश्चिक रास (Vraschik Zodiac)

या राशीच्या सातव्या घरात शुक्र आणि बुध आहेत. यासोबतच शनि चतुर्थ भावात असून शश राजयोग निर्माण करत आहे. या राशीच्या लोकांना कामाच्या बाबतीत उच्च फळ मिळणार आहे. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. सरकारी प्रकल्प मिळवण्यात तुम्हाला यश मिळू शकते. यासोबतच आर्थिक स्थिती चांगली राहील. धनप्राप्ती करण्यात यश मिळेल. वैवाहिक जीवनातील दरी आता संपुष्टात येऊ शकते. तुमच्या करिअरवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x