गुढी उभारताना कडुलिंबाचीचं पानं का वापरतात?

गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. ईश्वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानांनंतर कडूलिंबाच्या पानांत जास्त असते. 

Jaywant Patil Updated: Mar 18, 2018, 02:01 PM IST
गुढी उभारताना कडुलिंबाचीचं पानं का वापरतात? title=

मुंबई : गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. ईश्वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानांनंतर कडूलिंबाच्या पानांत जास्त असते. या दिवशी कडूलिंबाच्या कोवळया पानांद्वारे वातावरणात पसरलेल्या प्रजापति लहरी खेचून घेतल्या जातात. 

प्रजापति लहरी खेचून घेतल्या जातात

प्रजापति लहरी ग्रहण करण्यासाठी आवश्यक गुण सर्वसाधारण व्यक्तीत ईश्वराकडून येणाऱ्या लहरी ग्रहण करण्याची क्षमता खूप कमी असते.

सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी, ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून आणि प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी. गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवावे. 

गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी

गुढीला अर्पण केलेली फुले आणि आंब्याची पाने यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी. सूर्यास्तानंतर १ ते २ तासांत वातावरणात वाईट शक्तीनं कार्यरत होऊ लागतात. सूर्यास्तानंतरही गुढी उभी असल्यास त्यात वाईट शक्ती प्रवेश करू शकतात. त्या शक्तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो.