मुंबई : प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आमचं सेम असतं... हा अनुभव कोणत्याही काळात, कोणत्याही परिस्थितीत अगदी सारखंच असणार आहे. एक युवक आपल्या प्रेयसीला भेटायला चक्क नवरी बनून तिच्या घरी गेला. सुरूवातीला मुलीच्या नातेवाईकांना तिची मैत्रिण असल्याचं वाटलं. मात्र थोडी शंका आल्यावर त्या तरूणाला पकडून पदर वर केल्यावर सत्य सगळ्यांसमोर आलं. मात्र याचवेळी तरूणाची वाट पाहणाऱ्या दोन मित्रांनी त्याला पळवून नेलं.
नववधुचे लाल रंगाचे खास कपडे परिधान केले होते
A youth turned himself into newly wedded #bride in an attempt to meet his #girlfriend in Bhadohi district. pic.twitter.com/CRcTed2CFB
— Arvind Chauhan (@Arv_Ind_Chauhan) June 2, 2021
हा संपूर्ण प्रकार एका गावातील आहे. जिथे तरूण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क नववधुच्या कपड्यात आला होता. खांद्यावर लेडीज पर्स आणि पायात सँडल लाल रंगाची साडी नेसली होती. हे पाहून ही देखील नववधुची नवविवाहित मैत्रिण असल्याचा भास नातेवाईकांना झाला.
मंगळवारी दुपारी नववधुच्या वेशात हा तरूण प्रियकर प्रेयसीच्या घरी गेला. पण घरातील इतर मंडळींना शंका आल्यावर मात्र त्याने गुडघ्यावर बसून सगळ्यांची माफी मागितली. याच दरम्यान तरूण तेथून पळ काढू लागला. मात्र त्याला धावत जाऊन पकडलं. आणि कसून चौकशी केली. या दरम्यान त्याला मारहाण देखील करण्यात आली.