U19 World Cup : 9 खेळाडूंना कोरोनाची लागण; 2 सामने रद्द

ICC Under 19 World Cup 2022 वर पुन्हा एकदा कोरोनाचं सावट आलं आहे. 

Updated: Jan 29, 2022, 10:08 AM IST
U19 World Cup : 9 खेळाडूंना कोरोनाची लागण; 2 सामने रद्द title=

टारूबा (त्रिनिदाद) : ICC Under 19 World Cup 2022 वर पुन्हा एकदा कोरोनाचं सावट आलं आहे. कॅनडा क्रिकेट टीमचे 9 खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या टीममधील 9 खेळाडू पॉझिटीव्ह आल्यानंतर प्लेट इंवेटमधील 2 सामने रद्द करण्यात आलेत. 

सामना करावा लागला रद्द

कॅनडा टीममधील खेळाडू पॉझिटीव्ह आल्यानंतर कॅनडाचा स्कॉटलंड विरुद्धचा सामना रद्द करण्यात आला. तर दुसरा सामना युगांडा आणि पापुआ न्यू गिनी यांच्यातील सामन्यातील विजयी संघाचा होणार होता. ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये शनिवार आणि रविवारी अशा दोन दिवशी हे सामने होणार होते.

आयसीसीने यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात म्हटलंय की, "खेळाडूंना आता क्वारंटाईनमध्ये ठेवलं जाणार आहे. या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवलं जाईल. कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह प्रकरणांमुळे कॅनडाच्या टीमकडे सामन्यांमध्ये भाग घेण्यासाठी पुरेसे खेळाडू नाहीत."

ICC च्या निवेदनानुसार, "29 जानेवारी रोजी स्कॉटलंड विरुद्ध कॅनडाचा प्लेट प्ले-ऑफ सेमीफायनल रद्द करण्यात आला आहे. यानंतर खेळाच्या नियमांनुसार, स्कॉटलंडची टीम 13व्या-14व्या प्ले-ऑफसाठी पात्र ठरली आहे."