धोनीवर काय ही वेळ आली? क्रिकेट सोडून निवडणूकीच्या ड्युटीवर करतोय काम?

क्रिकेटनंतर धोनी इलेक्शन ड्युटीवर असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Updated: May 26, 2022, 08:53 AM IST
धोनीवर काय ही वेळ आली? क्रिकेट सोडून निवडणूकीच्या ड्युटीवर करतोय काम?  title=

मुंबई : आयपीएलची टूर्नामेंट आता शेवटच्या टप्प्यात आली असून चेन्नई सुपर किंग्जच्या टीमला यंदा प्लेऑफ गाठणं कठीण झालं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली ही टीम पॉईंट्स टेबलमध्ये 9 व्या स्थानावर होती. धोनी झारखंडमधील रांचीचा रहिवासी असून सध्या या ठिकाणी निवडणूकीचे वारे वाहतायत. दरम्यान क्रिकेटनंतर धोनी इलेक्शन ड्युटीवर असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर सगळीकडे एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. यामध्ये टीम इंडियाचा माजी खेळाडू महेंद्रसिंग धोनी इलेक्शन ड्युटीवर असून निवडणूकीचं काम करताना दिसतोय. मात्र हा व्यक्ती धोनी नसून तो हुबेहुब धोनीसारखा दिसणारा दुसरा व्यक्ती आहे.

व्हायरल PHOTO चं सत्य

या फोटोवरून महेंद्रसिंग धोनींच नाव झारखंडच्या निवडणूकांशी जोडलं जातंय. रांचीमध्ये निवडणूकांच्या दरम्यान एक व्यक्ती जो हुबेहुब धोनीसारखा दिसणारा आहे आणि लोकांनी याला धोनीचं समजलं. दरम्यान धोनीसारखाच दिसणाऱ्या या व्यक्तींचं नाव विवेक कुमार आहे. 

विवेक कुमार सीसीएल डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट मॅनेजर आहे. विवेक कुमार सध्या मतमोजणी केंद्रावर कार्यरत आहे. दरम्यान विवेक हुबेहुब महेंद्रसिंग धोनीसारखा दिसतो.