'हे' दोन क्रिकेटर प्रेमात! नयनरम्य निसर्गाच्या सान्निध्यात उडाली विकेट, पाहा Photo

'या' दोन क्रिकेटर्समध्ये फुलणार प्रेमाचा गुलाब  

Updated: Sep 12, 2022, 10:11 AM IST
'हे' दोन क्रिकेटर प्रेमात! नयनरम्य निसर्गाच्या सान्निध्यात उडाली विकेट, पाहा Photo title=

मुंबई : प्रेम (love life) हा असा शब्द आहे ज्याचं वर्णन शब्दात केलं जाऊ शकत नाही. प्रेमात पडल्यावर माणूस संपूर्ण बदलून जातो. आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली की,  जीवनाला एक नवी दिशा मिळते. आता दोन भारतीय क्रिकेटपटूंमध्ये प्रेमाचा गुलाब फुलत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार ऑलराउंडर वेदा कृष्णामूर्ती (Veda Krishnamurthy) आणि कर्नाटकचा क्रिकेटर अर्जुन होयसला (Arjun Hoysala) एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. अष्टपैलू वेदा कृष्णमूर्तीला कर्नाटकचा क्रिकेटर अर्जुन होयसालाने प्रपोज केलं आहे. 

अर्जुन होयसालाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. सोशल मीडियावर दोघांचे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत. अर्जुन होयसलाने गुडघ्यावर बसून वेद कृष्णमूर्तीला प्रपोज (propose) केलं. 

वेदा कृष्णामूर्तीसोबत व्यतीत केलेल्या खास क्षणांचे फोटो शेअर करत अर्जुनने कॅप्शनमध्ये , 'आणि ती हो म्हणाली...' (And, she said ‘Yes’) असं लिहिलं आहे. प्रपोजलनंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि एकत्र फोटो क्लिक केले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्यांनी महिला संघातील इतर खेळाडूंनी वेदा कृष्णमूर्तीला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या वेदा आणि अर्जुनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दोघांच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. 

कोण आहे अर्जुन होयसला? 
अर्जुन होयसला डावखुरा फलंदाज आहे. त्याने 2016 मध्ये कर्नाटकसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कर्नाटक प्रीमियर लीगमध्येही त्याने आपल्या खेळीतून अनेकांना आवक् केलं आहे. याशिवाय  शिवमोग्गा लायन्ससाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे.