आयुष बदोनीच्या सिक्सने महिलेला दुखापत, पाहा व्हिडीओ

आयुष बदोनी फायर मोड, असा भिरकवला बॉल की प्रेक्षकांमध्ये बसलेली महिला जखमी... पाहा व्हिडीओ

Updated: Apr 1, 2022, 08:39 AM IST
आयुष बदोनीच्या सिक्सने महिलेला दुखापत, पाहा व्हिडीओ  title=

मुंबई : लखनऊ विरुद्ध चेन्नई ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यामध्ये चेन्नईनं लखनऊ टीमला 211 धावांचं तगड आव्हान विजयासाठी दिलं होतं. लखनऊने 20 ओव्हरमध्ये हे टार्गेट पूर्ण केलं. लखनऊच्या 19 व्या ओव्हरमध्ये एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

20 लाख रुपये देऊन आयुष बदोनीला लखनऊने आपल्या टीममध्ये घेतलं. या आयुष बदोनीनं दोन्ही सामन्यात कामलीची कामगिरी केली आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात शिवम दुबेच्या बॉलवर त्याने असा जबरदस्त सिक्स ठोकला की सगळे पाहाचत राहिले. 

शिवम दुबेनं ठोकलेल्या सिक्समुळे स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांमधील महिलेला दुखापत झाली. या महिलेच्या थेट डोक्यात बॉल पडला. महिला बॉल लागल्याने व्याकूळ झाली. आपलं डोकं चोळत होती. आजूबाजूला असलेले प्रेक्षक तिच्याभोवती गोळा झाले आणि तिला मदत करू लागले. 

सुदैवाने ही दुखापत फार गंभीर नव्हती. ही महिला चेन्नई सुपरकिंग्सची फॅन असल्याची माहिती मिळाली आहे. शिवम दुबेचा हा फायर मोड पाहून सर्वजण थक्क झाले. 

पहिल्या सामन्यातही शिवम दुबे कर्णधार के एल राहुलच्या कामगिरीच्या तुलनेत टीममध्ये सरस ठरला. आता दुसऱ्या सामन्यातही त्याची कामगिरी उत्तम राहिली. लखनऊच्या विजयात शिवम दुबेचाही मोलाचा वाटा आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.