बीसीसीआयचा खेळाडूंना इशारा, या टी-20 लीगपासून लांब राहा

इंडियन ज्युनिअर प्रिमिअर लीग(आयजेपीएल) आणि ज्युनिअर इंडियन प्लेअर लीग (जेआयपीएल) या ज्युनिअर लीगला बीसीसीआयची मान्यता नाही

Updated: Oct 9, 2017, 07:47 PM IST
बीसीसीआयचा खेळाडूंना इशारा, या टी-20 लीगपासून लांब राहा title=

मुंबई : इंडियन ज्युनिअर प्रिमिअर लीग(आयजेपीएल) आणि ज्युनिअर इंडियन प्लेअर लीग (जेआयपीएल) या ज्युनिअर लीगला बीसीसीआयची मान्यता नाही, त्यामुळे या लीगमध्ये खेळाडूंनी खेळू नये, असे आदेश बीसीसीआयनं खेळाडूंना दिले आहेत. या लीगमध्ये खेळल्यास खेळाडूंवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बीसीसीआयनं दिला आहे.

मागच्या महिन्यात १९ ते २९ सप्टेंबर याकाळात आयजेपीएल टी-20 दुबईमध्ये खेळवण्यात आली होती. गौतम गंभीरही या लीगमध्ये खेळणार होता पण बीसीसीआयनं मान्यता न दिल्यामुळे त्यानं या लीगमधून माघार घेतली.

आयजेपीएल आणि जेआयपीएल या नावानं काही टी-20 मॅच, सीरिज आणि टूर्नामेंट, शिबीर होणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. या लीगचं बीसीसीआय किंवा आयपीएल आयोजन करत नाही किंवा आम्ही याचाशी जोडले गेललो नाही. या लीगला आम्ही मान्यताही दिलेली नाही, असं स्पष्टीकरण बीसीसीआयनं दिलं आहे.

बीसीसीआयची मान्यता नसलेल्या कोणत्याही लीगमध्ये परवानगीशिवाय खेळाडू गेला तर ते नियमांचं उल्लंघन असेल, असंही बीसीसीआयनं सांगितलंय. अशा लीगना समर्थन देणारे गौतम गंभीर, ऋषी धवन आणि पारस डोगरा या खेळाडूंनी अशा लीगमधून त्यांचं नाव मागे घेतल्याची प्रतिक्रिया बीसीसीआयनं दिली आहे.