सानिया आधी कोण होती शोएबची भारतीय पत्नी? घटस्फोट न देताच करणार होता दुसरा निकाह

Shoaib Malik's first wife : शोएब मलिकनं केलं तिसरं लग्न... सानिया आधीही केलं होतं एका भारतीय महिलेशी लग्न... जाणून घ्या कोण होती ती...

दिक्षा पाटील | Updated: Jan 20, 2024, 03:35 PM IST
सानिया आधी कोण होती शोएबची भारतीय पत्नी? घटस्फोट न देताच करणार होता दुसरा निकाह title=
(Photo Credit : Social Media)

Shoaib Malik's first wife : पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. या सगळ्यात आता त्यानं तिसरा निकाह केला आहे. शोएबनं पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला आहे. त्यामुळे शोएबनं सानियाला घटस्फोट दिला की नाही याची चर्चा सुरु आहे. कारण त्या दोघांनी त्यांच्या घटस्फोट झाला की नाही याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते दोघे वेगळे राहत असले तर घटस्फोटाची कोणतीही बातमी नाही. 

शोएबनं याआधी देखील असं केलं आहे. त्यानं त्याच्या पहिली पत्नीला घटस्फोट न देता सानियाशी निकाह करण्याचा निर्णय घेतला होता. आता असंच त्यानं तिसरं लग्न केलं की काय अशी चर्चा सुरु आहे. यावरून आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की सानियाच्या आधी त्यानं कोणाशी लग्न केलं होतं. सानियासोबत लग्न करण्याआधी शोएबचं लग्न भारताच्या हैदराबादमध्ये केलं होतं. यावरून ती महिला ही भारतीय असल्याचे म्हटले जाते. त्याची पहिल्या पत्नीचं नाव आयशा सिद्दिकी आहे. सानिया आणि शोएब यांचं 2010 मध्ये लग्न झालं आणि दोघांनी 13 वर्षाचा संसार केला. मात्र, काही काळात त्यांच्यात भांडण होऊ लागली आणि दुरावा निर्माण झाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

2010 मध्ये शोएब आणि सानियाच्या लग्नाच्या चर्चां आधी आयशा सिद्दीकी आणि त्याचं लग्न चर्चेत होतं. तेव्हा असं म्हटलं जातं होतं की आयशा सिद्दिकीला घटस्फोट न देता तो दुसरं लग्न करण्याचा विचार करत होता. तेव्हा आयशा सिद्दिकीनं सगळ्यांसमोर येऊन ती शोएबची पहिली पत्नी आहे आणि तिला घटस्फोट दिल्याशिवाय तो दुसरं लग्न करतोय. 

शोएबनं आयशासोबत कोणतंही नातं असण्यावर नकार दिला होता. मात्र, जेव्हा हे प्रकरण वाढलं तेव्हा त्यानं तिला घटस्फोट दिला. आयशानं सांगितलं की ती लठ्ठ आहे त्यामुळे शोएबला ती आवडत नाही. दरम्यान, शोएबनं 2002 मध्ये आयशानं लग्न केलं. तर शोएब नकार देत असल्यानं त्यानं तिनं तिच्या लग्नाच्या व्हिडीओतील एक क्लिप देखील शेअर केल्याचे म्हटले जाते. 

हेही वाचा : सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चां, शोएब मलिकनं केला तिसरा निकाह

शोएब आणि सानिया या दोघांमध्ये 2009 मध्ये जवळीक वाढू लागली होती. त्यानंतर 2010 मध्ये दोघांनी लग्न केलं. हे लग्न हैदराबादमध्येच झालं होतं. 2018 मध्ये सानिया आणि शोएब यांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्या मुलाचं स्वागत केलं. त्यांच्या मुलाचं नाव इजहान मिर्झा मलिक आहे.