'त्या' पराभवाची सिंधूने परतफेडच केली - बिग बी

 हे विजेतेपद मिळवणारी सिंधू पहिलीच भारतीय ठरली आहे. ‘त्या’ पराभवाची सिंधूने परतफेडच केली आहे', असं ट्विट बच्चन यांनी केलं. 

Updated: Sep 17, 2017, 11:13 PM IST
 'त्या' पराभवाची सिंधूने परतफेडच केली - बिग बी title=

मुंबई : सर्वप्रथम बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरुन सिंधूचं अभिनंदन केलं. ‘कोरिया ओपन सुपर सीरिज’च्या अंतिम सामन्यात भारताच्या पी व्ही सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तिच्या या विजयानंतर अवघ्या काही क्षणांतच सोशल मीडियावरुन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. यामध्ये सर्वप्रथम बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरुन सिंधूचं अभिनंदन केलं.

'तिनं करुन दाखवलं. पी व्ही सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिजचं जेतेपद पटकावलं. हे विजेतेपद मिळवणारी सिंधू पहिलीच भारतीय ठरली आहे. ‘त्या’ पराभवाची सिंधूने परतफेडच केली आहे', असं ट्विट बच्चन यांनी केलं. 

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ओकुहाराने सिंधूचा पराभव केला होता. त्याचाच संदर्भ घेत बिग बींनी हे ट्विट केलं. त्यासोबतच त्यांनी सिंधूचे काही फोटोसुद्धा पोस्ट केले. हे फोटो पाहता कोरिया ओपन सुपर सीरिजच्या अंतिम सामन्याचा आनंद खुद्द बिग बींनी घेतला असल्याचं स्पष्ट होतंय.