पराभूत ब्राझील फुटबॉल टीमच्या गाडीवर अंडी आणि दगडफेक

फुटबॉल चाहत्यांना अनावर झाला पराभव

Updated: Jul 10, 2018, 04:32 PM IST
पराभूत ब्राझील फुटबॉल टीमच्या गाडीवर अंडी आणि दगडफेक title=

मुंबई : सर्वाधिक पाच वेळा विश्वचषकाला गसवणी घालणाऱ्या ब्राझील संघाचं आव्हान बाद फेरीतच संपुष्टात आलं. बाद फेरीत ब्राझीलला बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागला आणि ब्राझील स्पर्धेबाहेर फेकला गेला. यामुळे ब्राझीलचे चाहते खुपच संतप्त झाले आहेत. ब्राझीलचा संघ मायदेशी पोहचल्यावर संघाच्या बसवर फुटबॉल चाहत्यांनी अंडी आणि दगडं फेकून मारली. दरम्यान चोख बंदोबस्तामुळे खेळाडूंला कोणताही त्रास झालेला नाही. सध्या फुटबॉल विश्वात ब्राझीलच्या या संतप्त चाहत्यांचीच चर्चा आहे. नेमार, पौलिन्हो, कुटिन्हो, मार्सिलो असे एकापेक्षा एक खेळाडू असलेल्या ब्राझीलला यंदा विजेतेपदासाठी जास्त पसंती होती. मात्र बाद फेरीत त्यांचा पराभव झाला आणि ब्राझीलवासियांचं सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं.