Live सामन्यादरम्यान कॅमेरामनने टिपले शनी आणि गुरु ग्रहाचे एकत्र फोटो

क्रिकेटच्या मैदानातून टिपले गुरु आणि शनीचे फोटो

Updated: Dec 20, 2020, 06:37 PM IST
Live सामन्यादरम्यान कॅमेरामनने टिपले शनी आणि गुरु ग्रहाचे एकत्र फोटो

मुंबई : न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. आज झालेल्या दुसर्‍या टी-20 सामन्यात यजमानांनी पाकिस्तानला पराभूत करून मालिका जिंकली. सामन्या दरम्यान एका कॅमेरामनने मात्र एक सुंदर दृष्य टिपलं आहे. खुल्या आकाशात पृथ्वीवरील इतर ग्रह पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो. सामना कव्हर करणाऱ्या एका कॅमेऱ्याने हे ऐतिहासिक दृष्य टिपली आहेत. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

शनि आणि गुरु हे दोन ग्रह एकमेकांच्या खूपच जवळ येणार आहेत. खगोलप्रेमींसाठी आणि अभ्यासकांसाठी हा ऐतिहासिक दिवस असणार आहे.

दरम्यान न्यूझीलंडचा संघ 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सामन्याच्या दुसर्‍या डावात कॅमेरामनने हे दृष्य टिपले आहे. कॅमेरामनने आपला कॅमेरा अशा दिशेने आकाशकडे झूम केला की त्याने हे दोन ग्रह सहज पाहता आले. 

फ्लॅश स्कोअर क्रिकेट कमेंटेटरने हा फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे. 

न्यूझीलंडने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना मंगळवारी नेपियरमध्ये खेळला जाईल.