चायना ओपन बॅडमिंटन : पी.व्ही सिंधू क्वार्टरफायनलमध्ये

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताच्या पी.व्ही.सिंधूने चायना ओपनच्या क्वार्टरफायनलमध्ये जागा मिळवलीये. गुरुवारी चीनच्या फुजोऊमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या राऊंडमध्ये सिंधूने चीनची युवा खेळाडू हान यूवर २१-१५, २१-१३ अशी मात केली. 

Updated: Nov 16, 2017, 07:15 PM IST
चायना ओपन बॅडमिंटन : पी.व्ही सिंधू क्वार्टरफायनलमध्ये title=

फुजोऊ : जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताच्या पी.व्ही.सिंधूने चायना ओपनच्या क्वार्टरफायनलमध्ये जागा मिळवलीये. गुरुवारी चीनच्या फुजोऊमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या राऊंडमध्ये सिंधूने चीनची युवा खेळाडू हान यूवर २१-१५, २१-१३ अशी मात केली. 

हे दोनही खेळाडू पहिल्यांदा आमनेसामने आले होते. यात सिंधूचे पारडे जड होते. पहिल्या गेममध्ये सुरुवातीला सामना अटीतटीचा होईल असे वाटत होते. मात्र सिंधूने अनुभवाच्या जोरावर आघाडी घेतली आणि पहिला गेम आपल्या नावे केला. 

दुसऱ्या गेममध्ये सिंधूने सुरुवातीला ६-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर ११-३ अशी आघाडीवर होती. मात्र हानने हार न मानता ९-१२पर्यंत खेळ नेला. मात्र सिंधूने त्यानंतर सलग पाच अंक मिळवताना मोठी आघाडी घेतली आणि दुसरा गेम जिंकला. 

दुसरीकडे महिला एकेरीत भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला मात्र पराभवाचा धक्का बसला. तर पुरुष एकेरीत एच एस प्रणॉय पराभूत झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.