कॉमनवेल्थमध्ये कांस्य पटकावणाऱ्या दीपककडे मोबाईलही नाही, कारण...

राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या दीपक लाथरनं कांस्य पदक पटकावलं. त्याला ६९ किलो वजनीगटात हे पदक मिळवण्यात यश आलं. भारताचं हे वेटलिफ्टिंगमधील चौथं मेडल ठरलं. मिराबाई चानू आणि संजिता चानूनं भारताला सुवर्ण पदकाची कमाई करुन दिली. तर गुरुराजानं रौप्य पदक मिऴवून दिलं. यानंतर दीपकनं केलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी यावेळी वेटलिफ्टर्सनं शानदार कामगिरी करुन दिलीय. 

Shubhangi Palve Updated: Apr 6, 2018, 11:14 PM IST
कॉमनवेल्थमध्ये कांस्य पटकावणाऱ्या दीपककडे मोबाईलही नाही, कारण...  title=

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या दीपक लाथरनं कांस्य पदक पटकावलं. त्याला ६९ किलो वजनीगटात हे पदक मिळवण्यात यश आलं. भारताचं हे वेटलिफ्टिंगमधील चौथं मेडल ठरलं. मिराबाई चानू आणि संजिता चानूनं भारताला सुवर्ण पदकाची कमाई करुन दिली. तर गुरुराजानं रौप्य पदक मिऴवून दिलं. यानंतर दीपकनं केलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी यावेळी वेटलिफ्टर्सनं शानदार कामगिरी करुन दिलीय. 

कांस्य पटकावणाऱ्या दीपक लाथर भारतातील चर्चित खेळाडू ठरलाय. कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदार्पण करणारा हरियाणाचा अवघ्या १८ वर्षांचा दीपक एकूण २९५ किग्रॅ (१३६ किग्रॅ + १५९ किग्रॅ) भार उचलून तिसऱ्या स्थानावर राहिला. 

'मी आत बसलो होतो आणि आशा करत होतो की प्रतिस्पर्धी लोअने आपल्या प्रयत्नात अयशस्वी ठरवा. मला माहीत आहे की कुणासाठी वाईट प्रार्थना करणं योग्य नाही, परंतु असं करण्यापासून मी स्वत:ला रोखू शकलो नाही' असं लाथारनं नंतर हसता हसता म्हटलं.

मी आज खूप खूश आहे. हा क्षण शानदार आहे. परंतु, आपण २०२० ओलम्पिकपर्यंत कोणताही कौतुकसोहळा साजरा करणार नाही, असंही दीपकनं यावेळी स्पष्ट केलं. 

दीपककडे मोबाईलही नाही... याचं कारण सांगताना तो म्हणतो, 'मी वडिलांशीही गेल्या तीन महिन्यांपासून बोललो नाही. कारण मी मोबाईलच माझ्यासोबत ठेवत नाही, फोन जवळ राहिल्यानं लक्ष दुसरीकडेच भरकटतं...' 

कॉमनवेल्थ पदक जिंकल्यानंतर आता दीपकचं लक्ष लागलंय ते २०२० साली होणाऱ्या ऑलिम्पिकवर...