नवी दिल्ली: फ्रान्सचे कोच डॅशचॅम्प्स यांनी अमेरिकेवरूद्ध आज होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकपूर्व सामन्यात स्टार फुटबॉलपटू आणि मिडफील्डर पॉल पोग्बाची पाठराखण केली आहे.
फ्रान्सबाबत बोलताना पोग्बाने म्हटले होते की, इटलीवर ३-१ असा विजय मिळवल्यावर फ्रान्सच्या प्रेक्षकांकडून खिल्ली उडवले जाणे योग्यच होते. यावर डॅशचॅम्प्सनी पोग्बाची पाठराखण करताना म्हटले की, मॅन्चेस्टर यूनायटेडचा हा खेळाडू संघासाठी खूप काही करू शकतो. पण, सर्वच करू शकत नाही.
दरम्यान, डॅशचॅम्प्सनी पुढे म्हटले आहे की, लोक पॉल पोग्बाबाबत बरीच चर्चा करतात. तो एक मिडफील्डर आहे. तसेच, तो १०व्या क्रमांकाचा खेळाडू मुळीच नाही. आणि तो फॉर्वर्डेडही नाही. त्याच्याकडे गोल करण्याची आणि गोल बनविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचीह ताकद आहे. तो एक संम्पूर्ण मिडफील्डर आहे. पण, असे असले तरी, तो संघासाठी बरेच काही करू शकतो. पण, सर्वच काही करू शकत नाही. अर्थात, त्याचाकडून खूप आपेक्षा आहेत.