जगातल्या या सर्वात सुंदर महिला क्रिकेटरने ठोकली डबल सेंच्युरी

अॅशेज सिरीजसाठी इंग्लंडची महिला क्रिकेट टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीम यांच्यात डे-नाइट टेस्ट मॅच खेळला जात आहे. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या एका क्रिकेटरने अशी बॅटींग केली की सगळेच हैराण झाले. 

Updated: Nov 11, 2017, 07:40 PM IST
जगातल्या या सर्वात सुंदर महिला क्रिकेटरने ठोकली डबल सेंच्युरी title=

नवी दिल्ली : अॅशेज सिरीजसाठी इंग्लंडची महिला क्रिकेट टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीम यांच्यात डे-नाइट टेस्ट मॅच खेळला जात आहे. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या एका क्रिकेटरने अशी बॅटींग केली की सगळेच हैराण झाले. 

ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर एलिस पेरीने पहिल्या इनिंगमध्ये दुहेरी शतक ठोकलं आहे. पेरीने 374 बॉलमध्ये 223 रन केले आहे. ज्यामुळे ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीमने पहिल्या इनिंगमध्ये 448 रन्सचा मोठा स्कोर उभा केला. याआधी इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये 280 रन केले होते.

टेस्ट करिअर

पेरीने तिच्या या इनिंगमध्ये 27 चौकार आणि एक छक्का लगावला. पेरीचा हा टेस्ट करिअरचा पहिलं दुहेरी शतक आहे. पेरीने 7 टेस्टमध्ये 61.71 च्या रनरेटने 432 रन बनवले आहेत. ज्यामध्ये एक शतक देखील आहे.

वनडे करिअर 

वनडेमध्ये 50.27 च्या रनरेटने तिने 94 सामन्यांमध्ये 2413 रन बनवले आहेत. पण वनडेमध्ये तिचं एकही शतक नाही. 82 टी-20 सामन्यामध्ये तिने 26.56 च्या रनरेटने 797 रन बनवले आहेत.

एक उत्कृष्ट बॉलर

पेरी एक चांगली बॉलर सुद्धा आहे. पेरीने 7 टेस्ट मॅचमध्ये 30 विकेट घेतले आहेत. 94 वनडेमध्ये तिने 126 विकेट घेतले आहे. 82 टी20 सामन्यामध्ये तिने ७७ विकेट घेतले आहे.