ENG vs PAK: क्रिकेटच्या सामन्यात तरुणानं केलं प्रपोज, तरुणीनं काय दिलं उत्तर तुम्हीच पाहा व्हिडीओ

. सीरिज जिंकलेल्या विजयापेक्षा चाहते आणि खेळाडूंचं लक्ष आणखी एका क्षणाने वेधून घेतलं. त्या खास क्षणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होतोय

Updated: Jul 21, 2021, 09:46 PM IST
ENG vs PAK: क्रिकेटच्या सामन्यात तरुणानं केलं प्रपोज, तरुणीनं काय दिलं उत्तर तुम्हीच पाहा व्हिडीओ

नई दिल्ली: प्रेमात असलेल्या तरुणाला वाटतं की आपण आपल्या गर्लफ्रेंडला हटके प्रपोज करावं. गर्लफ्रेंडचीही तशीच इच्छा असते. एका तरुणानं पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यात प्रपोज केल्याची घटना समोर आली आहे. तरुणानं चक्क स्टेडियममध्ये तरुणीला रिंग घेऊन प्रपोज केलं. या रोमान्समुळे स्टेडियममधील क्रिकेटप्रेमींचा आनंद द्विगुणीत झाला आणि सर्वजण या तरुणाला चिअर्स करून लागले. 

3 सामन्यांच्या सीरिजमध्ये शेवटच्या टी -20 सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला 3 गडी राखून पराभूत केलं. इंग्लंड संघाने ही सीरिज 2-1ने  जिंकली. सीरिज जिंकलेल्या विजयापेक्षा चाहते आणि खेळाडूंचं लक्ष आणखी एका क्षणाने वेधून घेतलं. त्या खास क्षणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

तिसऱ्या सामन्या दरम्यान एका तरुणानं चक्क तरुणीसमोर अंगठी धरली आणि तिला प्रपोज केलं. लाईव्ह मॅच दरम्यान तरुणनं केलेलं हे प्रपोज सर्वांसाठी आश्चर्याचा आणि चर्चेचा विषय ठरलं.

हे पाहून तरुणी खूप भावुक झाली आणि स्टेडियममध्ये तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते पण मनात खूप उत्साह आनंद भरला होता. तिने त्याला आपला होकार कळवला आणि सर्वांनी उत्साहाने टाळ्या वाजवत जल्लोष केला.

या व्हिडीओवर अनेक युझर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर इंग्लंड क्रिकेट बोर्डनं हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 67 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.