इंग्लंडची विजयी सलामी, बांगलादेशविरुद्ध ८ विकेट राखून विजय

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात इंग्लंडने बांगलादेशवर ८ विकेट राखून विजय मिळवलाय. ज्यो रुटच्या नाबाद १३३ आणि अॅलेक्स हेल्स(९५) आणि इयॉन मॉर्गनच्या नाबाद ७५ धावांमुळे इंग्लंडला बांगलादेशचे आव्हान पूर्ण करता आले. 

Updated: Jun 1, 2017, 10:49 PM IST
इंग्लंडची विजयी सलामी, बांगलादेशविरुद्ध ८ विकेट राखून विजय title=

ओव्हल : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात इंग्लंडने बांगलादेशवर ८ विकेट राखून विजय मिळवलाय. ज्यो रुटच्या नाबाद १३३ आणि अॅलेक्स हेल्स(९५) आणि इयॉन मॉर्गनच्या नाबाद ७५ धावांमुळे इंग्लंडला बांगलादेशचे आव्हान पूर्ण करता आले. 

बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ३०५ धावा केल्या. बांगलादेशचा सलामीवीर तामिम इक्बालने १२८ धावांची खेळी केली होती. तर मुशफिकर रहीमने ७९ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरादाखल इंग्लडने हे आव्हान ८ विकेट राखत पूर्ण केले. इंग्लंडडच्या सहा धावा झाल्या असताना बांगलादेशने त्यांना पहिला झटका दिला. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय अवघ्या एका धावेवर बाद झाला. मात्र त्यानंतर अॅलेक्स हेल्स आणि ज्यो रुट यांनी खेळपट्टीवर जम बसवताना १६४ धावांची भक्कम भागीदारी रचली. हेल्स ९५ धावांवर बाद झाल्यानंतर रुटने मॉर्गनसह खेळताना विजयावर शिक्कामोर्तब केले. रुटने १२९ चेंडूत १३३ धावा केल्या.