ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या या भारतीय क्रिकेटरच्या वडिलांचं निधन

भारतीय क्रिकेटर क्वारंटाईन असल्याने भारतात परतण्याच्या शक्यता कमीच...

Updated: Nov 21, 2020, 11:57 AM IST
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या या भारतीय क्रिकेटरच्या वडिलांचं निधन

मुंबई : आयपीएल २०२० मध्ये चमकदार कामगिरी करणारा मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन झालं आहे. टीम इंडियाचा हा वेगवान गोलंदाज सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी गेला आहे. सिराजच्या वडिलांचं ५३ व्या वर्षी निधन झाले आहे. ते फुफ्फुसांच्या आजाराने ग्रासले होते. वडिलांनी सिराजच्या यशामध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे आणि कठीण परिस्थिती असूनही त्यांनी आपल्या मुलाच्या कारकीर्दीला पाठिंबा दर्शविला.

Sydney में मौजूद Mohammed Siraj के पिता का निधन, क्या भारत लौटेंगे तेज गेंदबाज?

सिराजची आयपीएल टीम आरसीबीने ट्विट केले आहे की, “वडील गमावलेल्या मोहम्मद सिराज आणि त्याच्या कुटुंबासाठी आम्ही प्रार्थना आणि शोक व्यक्त करतो. संपूर्ण आरसीबी कुटुंब या कठीण काळात तुमच्या सोबत आहे. मियां, खंबीर राहा.'

हर्षा भोगले म्हणाले की, 'मोहम्मद सिराज आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल माझी संवेदना. त्याने मला यूएईमध्ये सांगितले होते की, त्याच्या कामगिरीमुळे त्याचे वडील किती खूश आहेत. त्याला सामर्थ्य मिळावे.'

क्वारंटाईनच्या नियमामुळे सिराज वडिलांच्या अंत्यविधीसाठी हैदराबादला येऊ शकणार नाही. अशी माहिती मिळते आहे. १३ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर सध्या भारतीय संघ १४ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला कसोटी सामना १७ डिसेंबरपासून एडिलेट ओव्हल येथे खेळला जाणार आहे.