FIFA World Cup 2022 : मेस्सीची 1000 वा सामन्यात कमाल; अर्जेंटिनाचा फिफा वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

FIFA World Cup Round of 16 :  अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक-2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.  

Updated: Dec 4, 2022, 10:13 AM IST
FIFA World Cup 2022 : मेस्सीची 1000 वा सामन्यात कमाल; अर्जेंटिनाचा फिफा वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश  title=
fifa world cup 2022 argentina beat australia to enter in quarter finals nmp

Argentina vs Australia, FIFA World Cup : फिफा वर्ल्डकपमध्ये (FIFA World Cup 2022)शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने (Argentina) ऑस्ट्रेलियाचा (Australia) 2-1 असा पराभव केला. अर्जेंटिनाने हा विजय मिळवतं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात स्टार फुलबॉलपटू लिओनेल मेस्सीची (Lionel Messi) कमाल खेळी पाहता आली. मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप आहे. शनिवारी मेस्सी त्याचा कारकिर्दीतील 1000 व्या सामना खेळत एक गोलही केला. 

मेस्सीची कमाल खेळी 

लिओनेल मेस्सीने कारकिर्दीतील 1000 व्या सामन्यात गोल करत पहिल्या हाफमध्येच अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. अशाप्रकारे मेस्सीने त्याच्या एकूण कारकिर्दीतील 789 वा गोल केला. मात्र, विश्वचषकाच्या बाद फेरीतील मेस्सीचा हा पहिलाच गोल ठरला. 35 वर्षीय मेस्सीच्या कारकिर्दीतील हा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो. त्यामुळे हा वर्ल्डकप जिंकण्याचा मेस्सी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. कारण आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत एकदाही फिफा विश्वचषक जिंकता आलेला नाही. (fifa world cup 2022 argentina beat australia to enter in quarter finals) 

आता अर्जेंटिना कोणाशी लढणार?

फिफा विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा नेदरलँड हा पहिला संघ ठरला आहे.

हेसुद्धा वाचा - IND vs BAN : 7 वर्षांपूर्वीचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज; जे धोनीला जमलं नाही, ते रोहित करुन दाखवलं का?

अ गटात दोन विजय आणि एक ड्रॉसह अव्वल स्थानावर असलेल्या नेदरलँडचा आता शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचा सामना होणार आहे.