close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

फुटबॉल स्टाईल भन्नाट कॅच पाहिलात का ?

टीम इंडियाचा विकेटकीपर धोनी हटके स्टाईल स्टंपिंगसाठी प्रसिद्ध आहे. 

Updated: Jun 20, 2019, 01:10 PM IST
फुटबॉल स्टाईल भन्नाट कॅच पाहिलात का ?

लंडन : टीम इंडियाचा विकेटकीपर धोनी हटके स्टाईल स्टंपिंगसाठी प्रसिद्ध आहे. असाच हटके स्टाईल कॅच पाहायला मिळाला आहे. इंग्लंडमध्ये सध्या काउंटी स्पर्धा सुरु आहे. यातल्या एका मॅचमध्ये स्पिनरने टाकलेल्या बॉलवर विकेटकीपरच्या मदतीने सिली पॉईंटला उभ्या असलेल्या फिल्डरने हा कॅच पकडला. या कॅचचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

स्पिनरने टाकलेला बॉल बॅट्समनला खेळता आला नाही. बॅट्समनच्या बॅटला बॉल लागून बॉल विकेटकीपरच्या हातात गेला. पण कीपरकडून तो बॉल मिस झाला. त्यावेळेस काही क्षणात त्या कीपरने धोनीसारखी चलाखी दाखवली. हातून सुटलेल्या बॉलला कीपरने फुटबॉलसारखी कीक मारली. सिली पॉईंटला उभ्या असलेल्या फिल्डरने हा कॅच पकडला.