फोटो : साडे चार महिन्यांची गरोदर असतानाही 'ती' विम्बल्डनमध्ये खेळली

महिला विभागात तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डनमध्ये खेळणारी एक महिला खेळाडू सध्या चर्चेचा विषय ठरलीय. 

Updated: Jul 5, 2017, 09:37 PM IST
फोटो : साडे चार महिन्यांची गरोदर असतानाही 'ती' विम्बल्डनमध्ये खेळली title=

लंडन : महिला विभागात तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डनमध्ये खेळणारी एक महिला खेळाडू सध्या चर्चेचा विषय ठरलीय. 

ही खेळाडू आहे लक्झमबर्गची मँडी मिनेला... साडे चार महिन्यांची गरोदर असतानाही मँडीनं विम्बल्डन टेनिस टूर्नामेंटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. 

जरी मँडीला आपलं आव्हानं पहिल्या राऊंडपेक्षा पुढे घेऊन जाता आलं नाही... तरी तिची ही खेळाडू वृत्ती अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरलीय. 

मँडी या वर्षाच्या शेवटाला आई बनणार आहे. जगात ८२ व्या क्रमांकावर असलेल्या मँडीनं मंगळवारी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोत तिचा पती आणि कोच, टिम सोमर विम्बल्डन कोर्टात मँडीसोबत पालक बनण्याचा आनंद जाहीर करताना दिसतोय. 

मीडियाशी बोलताना या सत्रात विम्बल्डन माझं शेवटची टूर्नामेंट आहे असं मँडीनं स्पष्ट केलंय.