नवी दिल्ली : बॉल टेंपरिंग प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर कॅमेरन बेनक्राफ्टवर केवळ मॅच फीवर ७५ टक्के दंड आणि बंदी न घातल्याप्रकरणी भारताचा स्पिनर हरभजन सिंगने नाराजी व्यक्त केलीये. हरभजनने यावेळी २००१मधील दक्षिण आफ्रिके टेस्टची आठवण करुन दिली. या कसोटीदरम्यान पाच भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, शिवसुंदर दास, दीपदास गुप्ता यांच्यावर मॅच रेफ्री माईक डेनिस यांनी विविध आरोपांखाली कमीत कमी एका कसोटीवर बंदी घातली होती.
यावेळी हरभजनने २००८मधील कसोटीचेही उदाहरण दिले. जेव्हा अँड्र्यू सायमंड्सविरोधत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी हरभजनवर तीन कसोटींची बंदी घालण्यात आली होती.
wow @ICC wow. Great treatment nd FairPlay. No ban for Bancroft with all the evidences whereas 6 of us were banned for excessive appealing in South Africa 2001 without any evidence and Remember Sydney 2008? Not found guilty and banned for 3 matches.different people different rules
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 25, 2018
हरभजन सिंगने ट्विट करुन ही नाराजी व्यक्त केलीये. वाह आयसीसी वाह. फेअरप्ले. सगळे पुरावे असतावा बेनक्राफ्टवर कोणतीही बंदी नाही. २००१मध्ये द. आफ्रिकेत आम्हाला जोरदार अपील केल्याप्रकरणी सहा जणांवर बंदी घालण्यात आली होती तेही पुराव्याअभावी. २००८मधील सिडनीमधील खेळाची आठवण तर असेलच. दोषी सिद्ध झालेलो नसतानाही तीन कसोटी सामन्यांची बंदी. वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे नियम.
द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात केपटाऊन येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीदरम्यान ही घटना घडली. आफ्रिका फलंदाजी करत होत. ३४वे षटक सुरु होती. यावेळी मार्करम आणि एबी डे विलियर्स खेळत होते. त्याचवेळी बेनक्राफ्ट एका चिपसारख्या वस्तूसकट कॅमेऱ्यात कैद झाला. सुरुवातीला ही बॉल चमकवण्यासाठी चिप असल्याचे सांगितले गेले. त्याने ती चिप बॉलवर घासली. दरम्यान, यावेळी अंपायरने बेनक्राफ्टला हटकले. तसेच अंपायरसमोर येण्यासाठी बेनक्राफ्टने पिवळ्या रंगाची वस्तू अंतवस्त्रात ठेवताना अंपायरने पाहिले होते. जेव्हा अंपायर त्याच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांनी ब्रेनकाफ्टच्या पँटचा खिसा चेक करुन पाहिला. यावेळी खिशात अनेक वस्तू होत्या.
यानंतर कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि बेनक्राफ्टने याप्रकरणी आपली चूक मान्य केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्मिथने बॉल टेंपरिंगचे प्रकरणाची जबाबदारी घेतली. तसेच बेनक्राफ्टनेही बॉल टेंपरिंग केल्याचे मान्य केले.