video - गोलंदाजांना घाबरविणार हरमनप्रीत रँपवर घाबरली...

 भारतीय महिला क्रिकेट टीमची उप कर्णधार हरमनप्रीत कौर म्हैसूर फॅशन वीक -२०१७मध्ये रविवारी रात्री रॅम्पवर उतरली. या शोमध्ये ड्रेस डिझायनर अर्चना कोच्चरसाठी ती रॅम्पवर उतरली. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 19, 2017, 06:41 PM IST
 video - गोलंदाजांना घाबरविणार हरमनप्रीत रँपवर घाबरली...  title=
(PIC : Harmanpreet Kaur/FB)

म्हैसूर :  भारतीय महिला क्रिकेट टीमची उप कर्णधार हरमनप्रीत कौर म्हैसूर फॅशन वीक -२०१७मध्ये रविवारी रात्री रॅम्पवर उतरली. या शोमध्ये ड्रेस डिझायनर अर्चना कोच्चरसाठी ती रॅम्पवर उतरली. 

हरमनप्रीतसाठी निळ्या रंगाचा ड्रेस तयार करण्यात आला. पहिल्यांदा रॅम्पवर आल्यावर ती जरा घाबरलेली दिसत होती. पण तिच्या चेहऱ्यावरील सुंदर हास्य पाहून शो मधील सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. 

यावेळी हरमनप्रीत म्हणाली, मी पहिल्यांदा रॅम्पवर चालली आहे. त्यामुळे मी खूप घाबरली होती.  नवीन काही वेगळे करावे यासाठी मी रॅम्पवर उतरली. 

 

महिला क्रिकेटमध्ये धडाकेबाज फलंदाजी करताना हरमनप्रीत मैदानावर खूप आक्रमक असते. हरमनप्रीतने महिला वर्ल्ड कप २०१७मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध आपल्या करिअरचे धमाकेदार शतक लगावले. तीने एकूण ७७ वन डे सामने खेळले आहेत. 

आपल्या उत्तुंग आणि दूरवर जाणाऱ्या षटकारांबद्दल ती म्हणाली, मला लहानपणापासून अशा प्रकारची फलंदाजी करणे पसंत आहे. मी या प्रकारे क्रिकेट शिकली आहे, मुलांसोबत क्रिकेट खेळल्यामुळे ते षटकार लगवायचे, मलाही षटकार मारणे आवडणे आहे.