Himachal Pradesh Vs Uttarakhand: क्रीडाक्षेत्रात रोज नवे विक्रम प्रस्थापित होत असतात. तर काही विक्रम मोडीत निघतात. क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ मानला जातो. कधी काय होईल सांगता येत नाही. काही सामन्यात जिंकता जिंकता पराभव होते. तर काही सामन्यात पराभव होता होता विजय होतो. कधी कधी फलंदाज, तर कधी गोलंदाज आपली कमाल दाखवतो. रणजी चषक स्पर्धेतील उत्तराखंड विरुद्ध हिमाचल प्रदेश सामन्यात असंच काहीसं झालं. 32 वर्षीय गोलंदाजाने 8 गडी बाद केले. भेदक गोलंदाजीच्या जोरावर संपूर्ण संघ 49 धावांवर तंबूत परतला.
हिमाचल प्रदेशचा कर्णधार ऋषि धवनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा निर्णय सपशेल चुकीचा ठरला असंच म्हणावा लागेल. हिमाचलचे फलंदाज खेळपट्टीवर हजेरी लावून तंबूत परतत होते. कारण उत्तराखंडच्या दीपक धपोलाच्या भेदक गोलंदाजीचा त्यांना अंदाजच आला नाही. धपोलाने 8 गडी बाद केले. तर अभय नेगी 2 गडी बाद केले. हिमाचलकडून अंकित कसेलीने सर्वाधिक 26 धावा केल्या. दीपक धपोलाने 8.3 षटकात 35 धावा देत 8 गडी बाद केले. तर दोन षटकं निर्धाव टाकली. हिमाचलचे पाच खेळाडू आपलं खातंही खोलू शकले नाहीत.
बातमी वाचा- David Warner Double Century : डेविड वॉर्नरने रचला इतिहास! मेलबर्न कसोटीत ठोकलं खणखणीत द्विशतक
उत्तराखंडने पहिल्या डावात 49 धावांचा पाठलाग करताना चहापानापर्यंत 4 गडी गमवून 158 धावा केल्या. प्रियंशु खंदुरीने (36), जिवन्जोत सिंगनं (45), कुणाल चंडेलानं (14) आणि स्वप्निल सिंहनं (12) धावा केल्या.