Olympic 2024: तब्बल 12 वर्षांनी भारताला नेमबाजीत कांस्यपदक मिळवून देणारी मनू भाकर कितवी शिकलीये?

Olympic 2024:भारताने तब्बल 12 वर्षानंतर नेमबाजीमध्ये कांस्यपक पटाकावलं. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत  उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मानू भाकरचा प्रवास हा आव्हानात्मक होता. 

Updated: Jul 29, 2024, 01:54 PM IST
Olympic 2024: तब्बल 12 वर्षांनी भारताला नेमबाजीत कांस्यपदक मिळवून देणारी मनू भाकर कितवी शिकलीये? title=

Olympic 2024: क्रिडा विश्वात सध्या ऑलिम्पिकचे वारे वाहत आहेत. 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनू भाकरने भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. गेल्या 12 वर्षांत भारताने नेमबाजीमध्ये कोणतंही पदक मिळवलं नव्हतं. 2012 मधली ऑलिम्पिक स्पर्धा लंडन येथे झाली होती. त्यावेळी विजय कुमार आणि गगन नारंग यांनी नेमबाजीमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिलं होतं. नेमबाजीमध्ये कांस्यपदक मिळवणारी मनू पहिली भारतीय महिला ठरली. 

221.7 गुणांनी मनूने कांस्यपदक जिंकलं. कोरियाच्या जिन ये ओहने 243.2 विक्रमासह सुवर्णपदकाची मानकरी ठरली तर  आणि किम येजीने 241.3 गुणांसह रौप्यपदक जिंकलं. तब्बल बारा वर्षानंतर कांस्यपदक मिळाल्यानंतर नेमबाजीमध्ये भारत आशावादी झाला आहे. मनूचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. बरीच आव्हानं पार करत तिने एवढं यश मिळवलं. मनू मुळची हरीयाणाची. तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल  मनू म्हणते की,  2021 मधली टोकियोला झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पिस्तूल खराब झालं. त्यामुळे मला पदक जिंकता आलं नाही. मी तेव्हाही खूप मेहनत घेतली पण त्यावेळी मला हार पत्करावी लागली. तेव्हा मला खूप नैराश्य आलं होतं. मेहनत घेऊनही अपेक्षाभंग होतो तेव्हा आलेलं अपयश पचवणं कठीण होतं. 

मनू पुढे असंही म्हणते की, अपयश पचवून मी पुन्हा उभी राहिले. त्यावेळी जे झालं त्यातून मला धडा मिळाला. मी पुन्हा नव्या जोमाने सराव करायला सुरुवात केली. त्यासाठी मला भगवद्गीतेचा आधार मिळाला. आलेल्या संकटांना मानसिकरित्या कसं सामोरं जावं यासाठी मला भगवद्गीतेची खूप मदत झाली. मी त्यानंतर माझ्या सरावावर लक्ष केंद्रित केलं. बाकी जिंकणं हरणं मी देवावर सोडून दिलं होतं. 

मनूने खेळात बरेच पुरस्कार पटकावले आहेत. 2020मध्ये तिला क्रीडा मंत्रालयाकडून अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आलं.  2019 मध्ये मानूला भारताकडून यंग ॲथलीट अ‍ॅव्हॉर्ड देण्यात आला होता. मनूच्या शैक्षणिक कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, २०२१ मध्ये तिने दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदवी मिळवली. यशस्वी खेळाडू असण्याबरोबरच मनू घोडेस्वारीमध्ये पारंगत आहे. संगीत आणि वाचन, चित्रकला आणि स्केचिंग, नृत्य आणि कोडे सोडवणे यासगळ्याची मानूसला आवड आहे. टेनिस,मार्शल आर्ट आणि कबड्डी, यासगळ्याचं देखील तिने प्रशिक्षण घेतलं. मानू दिवसभरातील पाच तास कटाक्षाने नेमबाजीचा सराव करते.