ICC punishes Shubman Gill: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये (WTC Final) भारताला मानहानीकारक पराभवाचं तोंड पहावं लागलं. ऑस्ट्रेलियन संघाने ओव्हलच्या मैदानावर भारताला 209 धावांनी पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. 444 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ पाचव्या दिवसाच्या लंच टाइमआधीच तंबूत परतला. पराभवाबरोबर आता भारतीय संघावर कारवाईचा बडगाही उगारला आहे. भारताचा सलामीवीर शुभमन गिलविरोधातही आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे.
सामान्याच्या दुसऱ्या दिवशी अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय क्रिकेट टीमला दंड ठोठावला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे भारतीय टीमला दंड ठोठवण्यात आला असून यामुळे सामन्यासाठी मिळणाऱ्या मानधनात मोठी कपात केली जाणार आहे. आयसीसीने या प्रकरणामध्ये ओव्हर्सच्या गतीचा समतोल राखण्यात अपयश आल्याबद्दल जेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाला दोषी ठरवलं आहे. ऑस्ट्रेलिय संघाच्या मानधानामधून 80 टक्के रक्कम कापण्यात येणार आहे. ठराविक वेळेत ठराविक षटकं न टाकल्यास संबंधित संघातील सर्व खेळाडूंच्या मानधानामध्ये सरसकट कापत करण्याचा आयसीसीचा नियम आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार स्लो ओव्हर रेटसंदर्भातील अनुच्छेद 2.22 अंतर्गत खेळाडूंबरोबरच सहयोगी स्टाफच्या मानधानामध्येही कपात करण्याचं प्रयोजन आहे. सहयोगी स्टाफच्या मानधानातील 20 टक्के रक्कम कापण्याची तरतूद नियमांमध्ये आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ठरलेल्या वेळेत भारतीय संघाने पाच ओव्हर कमी टाकल्या. तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने 4 ओव्हर कमी टाकल्या. त्यामुळे भारतीय संघाचं संपूर्ण म्हणजेच 100 टक्के मानधान कापलं जाणार आहे. ही सर्व रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.
भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलच्या मानधानामधील 15 टक्के रक्कम कापवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गिलने कॅमरुन ग्रीनचा झेल पकडतानाचा स्क्रीनशॉट सामना सुरु असतानाच म्हणजेच चौथ्या दिवशी ट्वीट केला होता. वादग्रस्त पद्धतीने बाद घोषित कऱण्यात आल्याने शुभमने मॅग्निफाइन ग्लासच्या इमोजीसहीत हा फोटो पोस्ट केला होता. गिलने थर्ट अंपायरच्या निर्णयावर अप्रत्यक्षपणे टिका करुन आयसीसीच्या अनुच्छेद 2.7 चं उल्लंघन केलं असा ठपका ठेवण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया पराभूत केल्याने भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याचं स्वप्न दुसऱ्यांदा भंग झालं. 2021 मध्ये साऊथहॅम्पटनमधील वर्ल टेस्ट सिरीजच्या पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडच्या संघाने भारताला पराभूत केलं होतं. भारताने हा सामना 8 विकेटने गमावला होता. यावेळेस भारताचा कर्णधार विराट कोहली होता. या पराभवानंतरही भारतीय संघाविरोधात टिकेची झोड उठली होती. पुन्हा भारताला अपयश आल्याने आता अगदी आयपीएलपासून ते सुमार कामगिरीपर्यंत अनेक मुद्दे उपस्थित करत भारतावर टीका केली जात आहे.