भारताने रचला इतिहास; पहिल्यांदाच Thomas Cup वर कोरलं नाव

73 वर्षांनी हा कप जिंकत भारताने इतिहास रचला आहे.

Updated: May 15, 2022, 03:37 PM IST
भारताने रचला इतिहास; पहिल्यांदाच Thomas Cup वर कोरलं नाव title=

बँकॉक : थॉमस कप बॅडमिंटन 2022 चा फायनल सामना अखेर भारताने जिंकला आहे. 73 वर्षांनी हा कप जिंकत भारताने इतिहास रचला आहे. बँकॉकच्या इम्पॅक्ट एरिनामध्ये ही स्पर्धा सुरु होती. या सामन्यांमध्ये भारतासमोर इंडोनेशियाची टीम होती. अखेरच्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतने जोनातन क्रिस्टीचा पराभव करत सरळ 3-0 ने सामना जिंकला.

पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुकाचा 8-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. दुसऱ्या दुहेरीत सात्विकसाईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने 18-21, 23-21, 21-19 असा विजय मिळवला. तिसरा सामना पुन्हा एकेरीचा होता. ज्यामध्ये किदाम्बी श्रीकांतने जोनाथन क्रिस्टीचा 21-15, 23-21 असा सरळ पराभव करत थॉमस कपवर पहिल्यांदा नाव कोरलं.

भारतीय टीमने मलेशिया आणि डेन्मार्क सारख्या टीमचा पराभव करत पहिल्यांदा फायनलमध्ये जागा बनवली होती. अशाच परिस्थितीत टीमचा आत्मविश्वास खूप वाढला होता. तर फायनलमध्ये 14 वेळा चॅम्पियन्सचा रेकॉर्ड असलेल्या इंडोनेशियाचा नमवत इतिहास रचला आहे.

या स्पर्धेत इंडोनेशियाची कामगिरी चांगली राहिली होती. या स्पर्धेत इंडोनेशिया एकंही सामना हरली नव्हती. तर भारतीय टीमला ग्रुप स्टेजमध्ये चायनीज तैपेईविरुद्ध एकमेव पराभव पत्करावा लागला. पण आता भारताने अंतिम फेरीत इंडोनेशियाचा पराभव केला आहे