VIDEO: क्रिकेटमध्ये नवा 'DHONI' येतोय? LIVE सामन्यात केली कमाल, माही स्टाईल रनआऊटची जोरदार चर्चा!

sharjah warriors vs desert vipers: धोनीला टक्कर देणारा खेळाडू कोण? आयपीएलला नाकारत इंटरनॅशनल लीग घातलोय धुमाकूळ... सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय Video

Updated: Feb 1, 2023, 07:26 PM IST
VIDEO: क्रिकेटमध्ये नवा 'DHONI' येतोय? LIVE सामन्यात केली कमाल, माही स्टाईल रनआऊटची जोरदार चर्चा! title=
MS Dhoni, Sam Billings

International League T20: सध्या युएईमध्ये खेळल्या जात असलेल्या इंटरनॅशनल लीग टी-ट्वेंटीची (International League T20) जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अनेक रंगतदार सामने पहायला मिळत असल्याने अनेक सिलेक्टर्स डोळे उघडे ठेवून या सामन्यांकडे पाहत आहे. या सामन्यात (sharjah warriors vs desert vipers) एक असा खेळाडू नरजेत भरलाय. आयपीएलला (IPL) डावलून विदेशी स्पर्धेत खेळण्याची तयारी दाखवणाऱ्या या खेळाडूने कमालच केली आहे. या पठ्ठ्याने विकेटकिपिंग (Dhoni style stumping) करताना रनआऊट केलं आणि सर्वांना धोनीची आठवण करून दिली. (cricket news international league t20 sam billings did ms dhoni style stumping in sharjah warriors vs desert vipers match)

चर्चेत असलेल्या विकेटकिपर बॅटरने कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) यंदाच्या हंगामात खेळणार नसल्याचं कळवलंय. मात्र, तो परदेशी लीगमध्ये धुमाकूळ घातलाना दिसतोय. इंग्लंडचा स्टार विकेटकीपर फलंदाज सॅम बिलिंग्‍स (Sam Billings) याने केलेल्या रनआऊटची चर्चा होताना दिसत आहे.

आणखी वाचा - IND vs NZ , 3rd T20I: किंवीचं काही खरं नाही...पांड्याने खेळला मोठा गेम, संघात 'या' खेळाडूची एन्ट्री!

सॅम बिलिंग्स आंतरराष्ट्रीय लीग टी-ट्वेंटीमध्ये (International League T20) डेझर्ट वायपर्स (Desert Vipers) फ्रँचायझीचा भाग आहे. हा संघ सध्या लीगच्या गुणतालिकेत टॉपवर आहे. मंगळवारी शारजाह वॉरियर्स (Sharjah Warriors) विरुद्धच्या सामन्यात डेझर्ट वायपर्सने 22 धावांनी विजय मिळवला. त्यावेळी बिलिंग्सने धोनीसारखा वेग दाखवत विरोधी संघाचा कर्णधार जो डेन्लीला रनआऊट केलं.

पाहा Video - 

दरम्यान, डेन्ली बिलिंग्सच्या (Sam Billings) चतुराईमुळे धावबाद झाला. ही घटना शारजाहच्या फलंदाजी वेळीच्या 10 व्या ओव्हरमध्ये घडली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. बॉल खेळल्यानंतर डेन्ली थोडा पुढे आला. त्यावेळी सॅमने चालाखी दाखवत दोन्ही पायाच्या मधून थ्रो करत विकेट उडवल्या. त्यामुळे डेन्ली बाद झाल्याचं पहायला मिळालं.