Ind vs Sa 3rd Odi | दीपक चाहरची वादळी खेळी व्यर्थ, आफ्रिकेचा टीम इंडियावर 4 धावांनी विजय

दक्षिण आफ्रिकेने (South Africa) टीम इंडियावर (Team India) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (Ind vs Sa 3rd Odi)  4 धावांनी थरारक विजय मिळवला आहे.  

Updated: Jan 23, 2022, 10:29 PM IST
Ind vs Sa 3rd Odi | दीपक चाहरची वादळी खेळी व्यर्थ, आफ्रिकेचा टीम इंडियावर 4 धावांनी विजय title=

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेने (South Africa) टीम इंडियावर (Team India) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (Ind vs Sa 3rd Odi)  4 धावांनी थरारक विजय मिळवला आहे. या विजयासह आफ्रिकेने 3 सामन्यांच्या मालिकेत एकतर्फी विजय मिळवला आहे. आफ्रिकेने 3-0 च्या फरकाने मालिका जिंकली आहे. आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 288 धावांचे आव्हान दिले होते. दीपक चाहरने (Deepak Chahar) निर्णायक क्षणी फटकेबाजी करत टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं होतं. मात्र अखेर थरारक सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. (ind vs sa 3rd odi south africa beat team india by 4 runs and win series at newlands cape town) 

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जयंत यादव, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल. 

साऊथ आफ्रिका | जनेमन मलान, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, सिसांडा मगला, केशव महाराज, लुंगी एन्गिडी आणि ड्वेन प्रिटोरियस.