Rohit Sharma: वनडे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर चाहते फारच निराश होते. हे दुःख विसरत असताना अंडर-19 वर्ल्डकपमध्ये देखील ऑस्ट्रेलियाने युवा टीम इंडियाचा पराभव करत भारतीयांच्या जखमेवर जणून मीठ चोळलं. 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यामध्ये 79 रन्सने टीम इंडियाच्या युवांचा पराभव झाला. दरम्यान या पराभवाला देखील चाहत्यांनी रोहित शर्माला ( Rohit Sharma ) जबाबदार धरलंय. नेमकं हे प्रकरणं काय आहे, जाणून घेऊया.
गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. त्यानंतर वनडे वर्ल्डकप आणि आता अंडर-19 वर्ल्डकपमध्ये देखील ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली आहे. त्यानंतर आता चाहते यासाठी भारतीय संघाचा वरिष्ठ कर्णधार रोहित शर्माला जबाबदार धरतायत. रोहित शर्मामुळे ( Rohit Sharma ) भारताने अंडर-19 वर्ल्डकपचं विजेतेपद गमावल्याचं चाहत्यांचे म्हणणे आहे.
Go well, boys!
— Rohit Sharma (@ImRo45) February 11, 2024
अंडर-19 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यानंतर टीमचा कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma ) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिप आणि वनडे वर्ल्डकप गमावल्या, ज्यामुळे चाहते नाराज आहेत. अशातच रोहित शर्माने ( Rohit Sharma ) अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी ट्विट करून टीम इंडियाला मोटीवेट केल्याने चाहते संतापले. चाहत्यांचे म्हणणे आहे की, रोहित शर्मा पनवती असून त्याच्या ट्विटमुळे भारताला अंडर-19 चे विजेतेपदही गमवावं लागलं आहे.
Even our U19 boys couldn’t win the world cup final and it all went wrong for them after taking advice from rohit sharmaworst captain ever, take retirement. #CaptivatingTheKing #MAFSAU #PakistanElections2024 #SuperBowl2024 #U19WorldCup2024 #الاردن_قطر #ViratKohli #RohitSharma
— youareblessed. (@maygodblessus7) February 11, 2024
#TeamIndia - Another Final Another Loss
(U19) Cricket World Cup
AUS Won By 79 Runs Over IND#RohitSharma & Team Definitely Give The Ans In Upcoming T20 WCCongrats Champions #Australia#U19WorldCup2024 #INDvAUS #Finals #U19WorldCupFinal #Aus #Ind pic.twitter.com/MWd3Z8ikIE
— Black Town (@townblack71) February 11, 2024
Rohit Sharma watching India in U19 World Cup final#U19WorldCup2024#INDvAUS pic.twitter.com/RX6PjOw6vV
— Nidhi Jain (@nidddhiiiii) February 11, 2024
My boy my boy pic.twitter.com/ErqnqtYh6u
— Raja Babu (@GaurangBhardwa1) February 11, 2024
Rohit Sharma's motivational message to U19 Team India playing the World Cup finals against Australia: pic.twitter.com/VkRh0R7JgJ
— Keh Ke Peheno (@coolfunnytshirt) February 11, 2024
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या खेळल्या गेलेल्या अंडर -19 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या दिलेल्या 254 धावांचं आव्हान पार करताना टीम इंडिया पत्त्यासारखी ढासळली. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाला 254 धावा करणं गरजेचं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने 79 धावांनी टीम इंडियाचा पराभव केला अन् 14 वर्षानंतर अंडर-19 वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे.