IND vs NZ : वॉशिंग्टन 'सुंदर' लढला पण भारत हरला, न्यूझीलंडचा 21 धावांनी विजय

युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने शेवटला येत आशा जिवंत केल्या होत्या. मात्र दुसऱ्या बाजून कोणीही नसल्याने त्याचेही प्रयत्न अपुरे पडले. सुंदरने 50 धावांची जिगरबाज खेळी केली.

Updated: Jan 27, 2023, 11:15 PM IST
IND vs NZ : वॉशिंग्टन 'सुंदर' लढला पण भारत हरला, न्यूझीलंडचा 21 धावांनी विजय title=

New Zealand Defeat India in first T20 Match : भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. न्यूझीलंड संघाने दिलेल्या 177 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला निर्धारित 20 षटकांमध्ये 9 गडी गमावत 155 धावा करत आल्या. युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने शेवटला येत आशा जिवंत केल्या होत्या. मात्र दुसऱ्या बाजून कोणीही नसल्याने त्याचेही प्रयत्न अपुरे पडले. सुंदरने 50 धावांची जिगरबाज खेळी केली. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये किवांनी 1-0 ने आघाडी घेतली आहे. (Indian team lost to New Zealand in the first T-20 match latest marathi Sport News)

भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. न्यूझीलंडकडून सलामीला फिन ऍलन आणि डेव्हॉन कॉनवे आले होते. ऍलनने त्याच्या स्टाईलमध्ये बॅटींग करायला सुरूवात केली. परंतु त्याला युवा खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने माघारी पाठवलं. त्यानंतर आलेल्या मार्क चॅप्मनला टप्प्यात घेत त्याचा कार्यक्रम केला. अप्रतिम कॅच घेत सुंदरने चॅप्मनला भोपळाही फोडू न देता बाद केलं होतं.  

डेव्हॉन कॉनवेने 52 धावांची आक्रमक खेळी केली. यामध्ये 7 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. त्यानंतर डॅरिल मिशेलने आक्रमक पवित्रा घेत अवघ्या 30 चेंडूत त्याने नाबाद 59 धावा करत न्यूझीलंड संघाला 170 धावांचा टप्पा पार करून दिला. भारताला 178 धावांचं आव्हान दिलं होतं. लक्ष्याचा पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाची सुरूवात निराशाजनक झाली. 

सूरूवातीला फलंदाजीला आलेल्या ईशान किशन 4 धावा, शुभमन गिल 7 धावा, राहुल त्रिपाठी 0 शून्य धावा करून परतले.  मैदानावर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी अंदाज घेतल्यावर फटकेबाजी करायला सुरूवात केली. मात्र सूर्या 47 धावांवर, हार्दिक पांड्या 21 धावांवर बाद झाले.  त्यानंतर आलेल्या युवा वॉशिंग्टन सुंदरने आक्रमक खेळी केली. वॉशिंग्टनने 50 धावा केल्या यामध्ये त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारला. दुसरीकडे भारताचे फलंदाज बाद होत होते अखेर 20 षटकांमध्ये भारतीय संघाला 155 धावांपर्यंत मजल मारता आली. दुसरा सामना यजमान टीम इंडियासाठी महत्त्वाचा असणार आहे.