IPL 2019 Auction: या २५ दिग्गजांवर नजर, लागणार सर्वाधिक बोली?

आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीचा लिलाव मंगळवार १८ डिसेंबरला जयपूरमध्ये होणार आहे.

Updated: Dec 18, 2018, 12:55 PM IST
IPL 2019 Auction: या २५ दिग्गजांवर नजर, लागणार सर्वाधिक बोली? title=

जयपूर : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीचा लिलाव मंगळवार १८ डिसेंबरला जयपूरमध्ये होणार आहे. या लिलावासाठी तब्बल १००३ खेळाडूंनी अर्ज दिले होते. पण लीगमधल्या ८ टीमनी यातल्या ३४६ खेळाडूंची यादी लिलावासाठी आयपीएल कार्यकारी परिषदेला सोपावली आहे. लिलावासाठी निवडण्यात आलेल्या ३४६ खेळाडूंपैकी ९ खेळाडूंची बेस प्राईज २ कोटी रुपये आहे. यात सॅम कुरन, ब्रॅण्डन मॅक्कलम, क्रिस वोक्स, लसीथ मलिंगा, शॉन मार्श, कोलीन इंग्राम, कोरे अंडरसन, एंजलो मॅथ्यूज आणि डी आर्सी शॉर्ट यांचा समावेश आहे.

मागच्या वर्षी जयदेव उनाडकटवर ११.५ कोटी रुपयांची बोली लागली होती. राजस्थानच्या टीमनं उनाडकटला विकत घेतलं होतं. मागच्या वर्षीच्या लिलावात उनाडकट सर्वाधिक बोली लागलेला भारतीय खेळाडू होता. पण निराशाजनक कामगिरीमुळे राजस्थाननं त्याला टीमबाहेर केलं. यावर्षी उनाडकटची बेस प्राईज १.५ कोटी एवढी आहे.

IPL 2019 Auction: टीमनी कायम ठेवलेले आणि सोडलेले खेळाडू

१.५ कोटीच्या यादीत जयदेव उनाडकटसोबत ९ परदेशी खेळाडू आहेत. यामध्ये डेल स्टेन आणि मॉर्नी मॉर्कल आहेत. १ कोटी रुपयांच्या बेस प्राईजमध्ये एकूण ४ भारतीयांसोबत १९ खेळाडू समाविष्ट आहेत. युवराज सिंग, अक्सर पटेल आणि मोहम्मद शमी यांची बेस प्राईज १ कोटी रुपये आहे. २०१५ साली युवराज सिंग तब्बल १६ कोटी रुपयांना विकला गेला होता. तर २०१८ मध्ये युवराजची बेस प्राईज २ कोटी रुपये होती. ७५ लाख रुपयांच्या बेस प्राईजच्या यादीत २ भारतीयांसह १८ खेळाडू आहेत. यामध्ये ईशांत शर्माचा समावेश आहे.

IPL 2019 Auction: पाहा कुठे आणि कधी सुरु होणार आयपीएल लिलाव

हे २५ दिग्गज खेळाडू लिलावात

ब्रॅण्डन मॅक्कलम, डेल स्टेन, युवराज सिंग, मार्टीन गुप्टील, एंजलो मॅथ्यूज, डीआर्सी शॉर्ट, कोरे अंडरसन, कॉलीन इंग्राम, शॉन मार्श, लसीथ मलिंगा, क्रिस वोक्स, सॅम कुरन, जयदेव उनाडकट, मॉर्ने मॉर्कल, जॉनी बेअरस्टो, ऍलेक्स हेल्स, मोहम्मद शमी, अक्सर पटेल, मॉयसेस हेनरीक्यूस, निकोलास पूरन, इशांत शर्मा, कार्लोस ब्रॅथवेट, शिमरोन हेटमायर, हजरतुल्लाह झझई, हनुमा विहारी

IPL 2019 Auction: अशी असणार प्रत्येक टीमची रणनिती