दुबई: पंजाब किंग्सचा कॅप्टन के एल राहुलने चेन्नईच्या बॉलर्सला घाम फोडला आहे. चेन्नई संघाला पंजाबसमोर गुडघे टेकण्याची वेळ आली. पंजाब संघाने 14 व्या हंगामातील 53 वा सामना आपल्या नावावर करत चेन्नईला धूळ चारली आहे. चेन्नईच्या चाहत्यांची मोठी निराशा झाली. पंजाब किंग्स संघाने दमदार सुरुवात केली. पंजाबचा कर्णधार के एल राहुल सर्वांना एकटा पुरुन उरला.
के एल राहुल शतकापासून केवळ 2 धावा दूर होता. नाहीतर IPLच्या यंदाच्या हंगामात त्याला शतक करण्यात मोठं यश आलं असतं. के एल राहूलने 42 बॉलमध्ये 98 धावा केल्या आहेत. मार्कडमने 8 बॉलमध्ये 13 तर मयंक अग्रवालने 12 बॉलमध्ये 12 धावा केल्या. चेन्नईकडून शार्दूल ठाकूरला तीन विकेट्स घेण्यात यश आलं.
शाहरुख खान केवळ 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. चेन्नई संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत 135 धावांचं लक्ष्य पंजाब संघासमोर ठेवलं. एवढं लक्ष्य़ पार करणं पंजाबला शक्य होईल की नाही असं चाहत्यांना वाटत होतं. मात्र दुसऱ्या टप्प्यात पंजाब पुन्हा दमदार फॉर्ममध्ये मैदानात उतरल्याचं दिसत आहे.
.@klrahul11 leading from the front!
The @PunjabKingsIPL captain brings up a 25-ball fifty. #VIVOIPL #CSKvPBKS
Follow the match https://t.co/z3JT9U9tHZ pic.twitter.com/4IZR8xuZv5
— IndianPremierLeague (@IPL) October 7, 2021
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पंजाबकडून के एल राहुलने वादळी खेळी केली. शतक हुकलं मात्र चेन्नईवर दणदणीत विजय मिळवला आहे. अवघ्या 13 ओव्हरमध्ये पंजाब संघाने 139 धावा करत विजय मिळवला आहे. पंजाबच्या बॉलर्सने देखील कामालीची कामगिरी केली होती.