IPL 2021: या खेळाडूला आज मिस करणार, ऋषभ पंतची टीम RRवर भारी पडणार?

दिल्ली कॅपिटल्स संघातील एका गोलंदाजाला कोरोना झाला आहे. तर राजस्थान रॉयल्स संघातील दोन खेळाडूंना दुखापत झाली होती.

Updated: Apr 15, 2021, 11:51 AM IST
IPL 2021: या खेळाडूला आज मिस करणार, ऋषभ पंतची टीम RRवर भारी पडणार?

मुंबई: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता सामना होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ तयार आहेत मात्र आजच्या सामन्यात एका खेळाडूची कमी भासणार आहे. 

राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू बेन स्टोक्सच्या हाताला दुखापत झाल्यानं तो IPLमधून बाहेर गेला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघ या खेळाडूला आजच्या सामन्यासाठी मिस करणार आहे. तर ऋषभ पंत, शिखर धवन आणि पृथ्वी शॉचा जलवा आज पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो. 

दिल्ली कॅपिटल्स संघातील एर्निच नॉर्टिए या गोलंदाजाचा कोरोना रिपोर्ट नुकताच पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तो सध्या सामना खेळू शकणार नाही. तर अक्षर पटेल आजच्या सामन्यात मैदानात उतरणार का? याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे.

राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेइंग इलेवन

मनन वोहरा, जोस बटलर (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, डेव्हिड मिलर, शिवम दुबे, रायन पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाळ, चेतन सकारिया आणि मुस्ताफिजुर रहमान

दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग इलेवन

पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शिमरन हेटमीयर, मार्कस स्टोइनिस, ख्रिस वॉक्स, आर अश्विन, कागिसो रबाडा, अमित मिश्रा आणि अवेश खान.