मुंबई : इंडियन प्रिमीयर लीग या स्पर्धेकडे संपूर्ण जगातील क्रीडारसिक आणि खेळाडूंचं लक्ष लागलेलं असतं. जगातील अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात. पण, अनेकदा काही खेळाडूंची स्वप्न पूर्ण होत नाहीत. ज्यामुळं आयपीएलऐवजी इतर लीग स्पर्धांकडे हे खेळाडू त्यांचा मोर्चा वळवतात. (IPL 2021 yusuf-pathan-and-sudeep-tyagi-registered-for-lanka-premier-league-2021)
मागील काही काळापासून अनेक भारतीय खेळाडूंनीही परदेशी लीग स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. सध्याच्या घडीला अशाच काही खेळाडूंच्या नावाची चर्चा सुरु आहे. जिथं भारताचा वेगवान गोलंदाज सुदीप त्याही, यष्टीरक्षक आणि फलंदाज मनविंदर बिस्ला, यांच्याव्यतिरिक्त युसूफ पठाण याचाही या खेळाडूंच्या यादीत समावेश आहे.
या खेळाडूंनी लंका प्रिमीयर लीगमध्ये सहभागी होण्यासाठी स्वारस्य दाखवलं आहे. श्रीलंककेकडून सध्याच्या घडीला भारतातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंपैकी फक्त युसूफ पठाण याच्याच नावाचा खुलासा केला आहे. पण, इतर खेळाडूंच्या नावाचा उल्लेख होण्याकडेच सर्वांच्या नजरा आहेत.
तिथं बिस्ला आणि त्यागी या दोघांनीही आयएनएस या वृत्तसंस्थेकडे आपण एलपीएलसाठी नोंदणी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या खेळाडूंनी आयपीएकमध्येही खेळाचं प्रदर्शन दाखवलं आहे. पण, त्यांच्या कारकिर्दीला इथं फारसं यश आलेलं नाही. दरम्यान, यापूर्वीाही अनेक खेळाडूंनी एलपीएलमध्ये सहभाग घेतला आहे. पण, त्याची अधिकृत माहिती मात्र समोर आली नव्हती. इरफान पठाण, त्यागी, मुनाफ पटेल यांनी एलपीएल 2020 मध्ये सहभाग घेतला होता. नियमानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून कोणत्याही खेळाडूला परदेशी लीगमध्ये सहभागी होण्याची अनुमती नाही. याकरता खेळाडूंना बीसीसीआय क्रिकेटमधून निवृत्ती घेणं गरजेचं असतं.